चोपडा जनसंघर्ष मोर्चाच्या वतीने मुख्याधिकारी यांचा सत्कार करत चोपडेकरांच्या समस्यांचा वाचला पाढा…
महाराष्ट्र 9न्यूज नेटवर्क
चोपडा येथील जनतेचा समस्यांना न्याय मिळून देण्यासाठी व तालुक्यात व शहरात फोपावलेल्या भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी अमृतराज सचदेव व डॉ.रवींद्र पाटील यांनी दोन दिवसापूर्वी स्थापित केलेल्या जन संघर्ष मोर्चाच्या वतीने चोपडा नगर परिषद यांचा दालनात जन संघर्ष मोर्चाचा सदस्यांनी मुख्याधिकारी हेमंत निकम यांचा सत्कार करत चोपडा शहरातील विविध समस्यांवर चर्चा करत नित्कृष्ट रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी व त्या ठेकदराला काळया यादीत टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच चोपडा शहरातील बहुतांश भागात स्ट्रीट लाईट नेहमी बंद असतात व जागोजागी कचऱ्याचे ढीग व सर्वात महत्वाचं म्हणजे चोपडा शहरात पाणी दहा ते बारा दिवसात येते यावर योग्य ते नियोजन करून शहरवासीयांना किमान दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा याची व्यवस्था करावी अशी मागणी डॉ रवींद्र पाटील यांनी केली आहे.


जन संघर्ष मोर्चाचे प्रमुख अमृतराज सचदेव ( व्यापारी मंडळाचे अध्यक्ष ) व डॉ. रवींद्र पाटील ( माजी नगरसेवक चोपडा ) यांनी नगर परिषदेच्या प्रांगणात आपली मनोगते व्यक्त केली .ते म्हणाले की, चोपडा शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून पाच – पाच कोटी रुपये खर्च करून अवघ्या सहा महिन्यात रस्त्यांची अवस्था जर खराब होत असेल आणि पुन्हा त्याच रस्त्यांसाठी टेंडर निघत असतील तर हे अत्यंत भयावह आहे. ठेकेदाराला मोठ्या प्रमाणात टक्केवारी द्यावी लागते .जवळपास २५ ते ३० टक्क्यापर्यंत ठेकेदाराला टक्केवारी वाटप करावी लागते त्यामुळेच ठेकेदार निकृष्ट प्रकारचे रस्ते तयार करतो व त्या रस्त्यांचे आयुष्य अवघे ६ महिन्यांवर येऊन जाते. यापुढे चोपडा शहरात व तालुक्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात कृती केली तर जन संघर्ष मोर्चा निश्चित सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारची ग्वाही जनसंघर्ष मोर्चाच्या प्रमुखांनी दिली तसेच चोपडा नगर परिषदेला लाभलेले मुख्याधिकारी हेमंत निकम हे अत्यंत कर्तव्यदक्ष असून त्यांच्याकडून भ्रष्टाचाराला व टक्केवारीला निश्चित लगाम लागेल अशा प्रकारची आशा जनसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यावेळी माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल ,नरेंद्र तोतला ,प्रमोद अग्रवाल,प्रमोद बोरसे,गिरीश पालीवाल, गोपाळराव सोनवणे,पुंडलिक महाजन,नरेश महाजन,समाधान माळी,प्रवीण जैन,प्रवीण गुजराथी,संतोष अहिरे, यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते

नगर परिषदेनंतर जनसंघर्ष मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळले तेथे आधी गणेश पाटील नावाचे कार्यकारी अभियंता कार्यरत होते ते अत्यंत आळशी व टक्केवारी घेण्यात पटाईत होते व कोणत्याही प्रकारचे काम त्यांच्याकडून वेळेवर होत नसे अशा प्रकारचे आरोप जन संघर्ष मोर्चाचे अमृतराज सचदेव यांनी केले व त्यांच्या कार्यभार नवीन कार्यकारी अभियंता राजपूत यांनी स्वीकारला असून त्यांनी आता कामाला गती द्यावी व होत असलेली मोठ्या प्रमाणातली टक्केवारी थांबवावी अशा प्रकारची हात जोडून विनंती अमृतराज सचदेव यांनी केली आहे.

अवघ्या दोन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या जन संघर्ष मोर्चाला चोपडा शहर व तालुक्यातून उदंड असा प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य लोक त्यात सहभागी होताना दिसून येत आहे. शहर व तालुक्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला असून व टक्केवारीचे प्रमाणही वाढले असून या सर्व बाबींना सर्वसामान्य नागरिक वैतागला होता. जर जन संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून खरोखरच भ्रष्टाचार मुक्त चोपडा होत असेल , टक्केवारी मुक्त चोपडा होत असेल तर निश्चितच सर्वसामान्यांच्या हितासाठी जन संघर्ष मोर्चा लवकरच उदयास येईल व त्याला सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा देतील यात तीळ मात्र शंका नाही..













