अधिकचा परतावा देण्याच्या नावाखाली महिलेची १६ लाखांत फसवणूक ; अडावद पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !…

अधिकचा परतावा देण्याच्या नावाखाली महिलेची १६ लाखांत फसवणूक ; अडावद पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी) : –


चोपडा तालुक्यातील अडावद येथील नागरिकांना पैसे गुंतवा तसेच इतरांनाही गुंतवणूक करायला लावून जास्तीत जास्त परतावा आणि इतर फायदे मिळवा, असे आमिष दाखवून हरियाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. आणि इतर कंपनीच्या नावाखाली लोणी येथील विवाहितेला १६ लाखांत गंडवल्याप्रकरणी अडावद पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रतिभा हिरालाल पाटील (वय ३८, रा. लोणी ता.चोपडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरियाणातील हिस्सारमधील फ्युचर मेकर लाईफ केअर आणि इतर कंपनीच्या नावाखाली विनोद पाटील, स्वाती रमेश जाधव, रमेश जाधव (रा.चोपडा), कल्पना बाळू पाटील, बाळू पाटील, गजानन पाटील (रा. पंचक ता. चोपडा) यांनी विश्वास संपादन करुन ३० मे २०१७ ते २०२२ पर्यंत तब्बल १६ लाख २ हजार ५०० रुपयात फसवणूक केली. प्रतिभा पाटील यांनी सोनं, जमीन आणि बचत केलेली रक्कम अधिक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवली होती. परंतू पैसे परत मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.जयदीप राजपूत हे करीत आहेत.


सदर फ्युचर मेकर कंपनीने तालुक्यातील अनेक व्यक्तींना गंडविले असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील शेकडो लोकांनी यात पैसा गुंतवला असल्याचे बोलले जात आहे. यामागील मास्टर माईंड एकच असून त्याचा शोध पोलिसांनी कसून घ्यावा व त्यालाही जेरबंद करावे असेही बोलले जात आहे .अनेक छोटे व्यवसायिक ,महिला व्यवसायिक व निवृत्त व्यक्ती यांनी पैसा वाढेल या आमिषाने त्यांनी विश्वास ठेवून गुंतवणूक केली आहे परंतु त्यांची केलेली गुंतवणूक अद्यापही परत मिळाले नाही व पैशांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही व त्यांची शुद्ध फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे .तरी यामागील तालुक्यातील मास्टरमाईंड व्यक्तीला पोलिसांनी ताबडतोब जेरबंद करावे व सामान्य व्यक्तींना न्याय मिळावा अशी मागणी फ्युचर मेकर कंपनीत गुंतवणूक केलेल्या लोक करीत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More