गुप्तांगावर वार करीत अकुलखेड्याच्या तरुणाचा खून!
महाराष्ट्र 9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–
चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील ३० वर्षीय तरुणाची गुप्तांगावर वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळं खळबळ उडाली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) (वय ३०, रा. पिसनाबल ता सेधंवा जि. बडवाणी ह.मु. अकुलखेडा ता चोपडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.


या संदर्भात मयताचा भाऊ दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दि. २ ऑक्टोंबर २०२२ रोजीचे सांयकाळी ४.३० ते दि. ३ ऑक्टोंबरच्या रोजी सकाळी १०.३० वाजेपूर्वी कोणी , कोणत्या तरी कारणावरुन दिनेशचा खून केला आहे. दिनेशचा मृतदेह अकुलखेडा गावाजवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारीजवळ मिळून आला होता. दिनेशच्या गुप्तांगावर गंभीर दुखापत आढळून आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करीत आहेत…..














