सुटकार येथील ग्रामसेवकाची कर्तव्यात कसूर… म.गांधी जयंती दिनी गैरहजर… सामाजिक कार्यकर्ते शशिकांत ठाकरे यांची वरिष्ठांकडे तक्रार… कारवाईची मागणी…

सुटकार येथील ग्रामसेवकाची कर्तव्यात कसूर… म.गांधी जयंती दिनी गैरहजर… सामाजिक कार्यकर्ते शशिकांत ठाकरे यांची वरिष्ठांकडे तक्रार… कारवाईची मागणी…


   महाराष्ट्र9न्यूज नेटवर्कचोपडा प्रतिनिधी :-


  चोपडा तालुक्यातील  वटार व सुटकार येथील ग्रामसेवक जयवंत पाटील यांनी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी ग्रामपंचायतीत हजर राहणे क्रमप्राप्त असताना त्या दिवशी ते गैरहजर राहिले व आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम घेणे अपेक्षित असताना देखील अनुपस्थितीत राहिले त्या संदर्भात सुटकार येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत ठाकरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.


   सविस्तर वृत्त असे की , सुटकार येथील ग्रामसेवक जयवंत पाटील यांना २ ऑक्टोबर रोजी शासन निर्णयानुसार  म. गांधी जयंती साजरी करणे क्रमप्राप्त असताना ते गैरहजर राहिले व त्यांच्यामुळे ग्रामपंचायत सुटकार येथे महात्मा गांधी जयंती साजरी करता आली नाही. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी शशिकांत ठाकरे यांनी वरिष्ठांकडे केले आहे .


    ग्रामसेवक जयवंत पाटील सुटकार ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ यांना कोणताच शासन निर्णयांची माहिती देत नाहीत व त्यांची अमंलबजावणी देखील करीत नाहीत. शासन निर्णयाप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करणे क्रमप्राप्त होते परंतु ते ग्रां.पं. ला गैरहजर असल्याने जयंती साजरी करता आली नाही तरी त्यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केला आहे असे स्पष्ट होते.


    जिल्हा परिषद कर्मचारी सेवा नियम शिस्त व अपील या अधिनियमाअन्वये ग्रामसेवकावर कारवाई करण्याच्या अधिकार गट विकास अधिकारी यांना आहे तरी गटविकास अधिकारी यांनी सदर कामचूगार ग्रामसेवकावर कारवाई करावी अशा आशयाची लेखी तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे तसेच ९ ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती देखील शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायतीत साजरी होणे आवश्यक असताना त्या दिवशी देखील ग्रामसेवक गैरहजर राहिले तरी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More