फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी… विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ… शहर पोलिसात गुन्हा दाखल…

फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी… विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ… शहर पोलिसात गुन्हा दाखल…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा तालुक्यातील आडगाव येथील विवाहितेस पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली .सदर २५ लाख रुपये देण्यास विवाहितेने नकार दिल्याने पती, सासू व जेठ यांनी सातत्याने विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करत गांजपाट केला म्हणून चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


सविस्तर वृत्त असे की , जितेंद्र पांडुरंग पाटील ( पती ) रा. पुणे , मंगलाबाई पांडुरंग पाटील ( सासू ) रा.आडगाव व संदीप पांडुरंग पाटील ( जेठ ) रा. नाशिक यांनी संगनमताने फिर्यादी हिस पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपये आणावेत या कारणावरून व सदर पैसे आणण्यास फिर्यादी यांनी नकार दिला म्हणून आरोपी जितेंद्र पांडुरंग पाटील ( पती ) ,मंगलाबाई पांडुरंग पाटील ( सासू ) व संदीप पांडुरंग पाटील ( जेठ ) यांनी फिर्यादीस वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादिचा वेळोवेळी शरीरिक व मानसिक छळ करून गांजपाट करून फारकतीची मागणी केली व साक्षीदार यांना देखील शिवीगाळ केली म्हणून चोपडा शहर पोलिसात सीसीटीएनएस भाग ५ गुं र नं ४१८/२०२२ भादवी कलम ४९८ , ३२३ ,५०४ , ५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आरोपी फिर्यादीस १३ डिसेंबर २०१९ पासून ते आजपावेतो सासरी व गुजराथी गल्ली येथील माहेरी येथे पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपयांची सातत्याने मागणी करीत होते. सदर मागणीला विवाहितेने नकार दिल्याने आरोपी सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करत असल्याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


सदर गुन्ह्याच्या पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना.किरण गाडी लोहार हे करीत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More