गरताड येथून राहत्या घरातून २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास… पोलिसात गुन्हा दाखल…

गरताड येथून राहत्या घरातून २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास… पोलिसात गुन्हा दाखल…


महाराष्ट्र 9 न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–


चोपडा तालुक्यातील गरताड येथील केशरलाल मोतीलाल पाटील यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने २ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्या व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.


सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील गरताड येथील केशरलाल मोतीलाल पाटील वय ४६ व्यवसाय शेती यांच्या बंद घराचा अज्ञात चोरट्याने मागील बाजूच्या दरवाज्याच्या कडीकोंडा तोडून आत प्रवेश करून किचन रूमचे बाजूस असलेल्या रूम मधील गोदरेज कपाटात ठेवलेले २ लाख ७४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व ११ हजार रुपये रोख अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत .

चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गु र न भाग ५ , ४२७/२०२२ भादवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर गुन्ह्याच्या अधिक तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More