विरवाडे येथील तरुणाची फसवणूक, नवविवाहिता दागिने घेऊन पसार… पोलिसात गुन्हा दाखल…

विरवाडे येथील तरुणाची फसवणूक, नवविवाहिता दागिने घेऊन पसार… पोलिसात गुन्हा दाखल…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–


चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील दीपक भुरेसिंग बारेला वय ३९ धंदा – शेती यांची २ लाख ९० हजार रुपयात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील दिपक भुरेसिंग बारेला याची आरोपी सौ. राधा रामधन परदेशी वय – ४२ , रामधन मोहन परदेशी वय – ४५ दोन्ही रा. नाशिक , सौ. कविता कृष्णा कडाळी वय – २१ रा. पोसार मोखाडा जव्हार , कविताचा भाऊ अमित कातकारी रा. मोखाडा जव्हार , कैलास अशोक पाटील वय – ४५ उधना – सुरत यांनी संगणमत करुन फिर्यादी यांनी आरोपी यांचे सांगणे वरुन सौ.राधा परदेशी यांच्या बँक अकाउन्ट मधे ५०,०००/- रुपये टाकले व रामधन परदेशी यांना फिर्यादी यांचे लग्ना करीता १,४०,०००/- रुपये देवून, सौ. कविता कडाळी हिस लग्नासाठी १,००,०००/- रुपयाचे कपडे व दागीने घेवुन दिपक बारेला ( विरवाडे ) व सौ. कविता कडाळी यांचे लग्नाचे बनावट कागदपत्र तयार करुन पंचवटी नाशिक येथे दिपक बारेला व सौ. कविता कडाळी हिचेशी लग्न लावुन दिले.


लग्नानंतर सौ. कविता कडाळी हिने दिपक बारेला यांस माझे पहिले लग्न झाले आहे. मी पहिल्या पती कडे महिना व तुमच्या कडेस १५ दिवस राहिल असे सांगितले. सौ. कविता हिने दिपक यांचे घरातील लोकांची नजर चुकवुन घरात असलेल्या तीन कपाटातुन सोन्याचे दागीने चोरुन घेवुन तिचे माहेरी निघुन गेली. यातील आरोपीतांनी फिर्यादी यांचेशी लग्नाचा बहाणा करुन फिर्यादी व त्यांचा नातलगांचा विश्वास संपादन करुन फसवणुक केली म्हणुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात सी सी टी एन एस भाग ५ गु र न ४२९/२०२२ भादवि कलम १२० ब , ३७९,४२०,४०६,४६३,४६४,४६५,४६८,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याचा अधिक तपास चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका जितेंद्र सोनवणे करीत आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More