वरगव्हाण येथे गुरांच्या गोठ्याला आग: ऐन दिवाळीत शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट;शासकीय मदत मिळावी — मागणी

वरगव्हाण येथे गुरांच्या गोठ्याला आग: ऐन दिवाळीत संदीप पाटील यांच्यावर आर्थिक संकट;शासकीय मदत मिळावी —  चोपडा

   प्रतिनिधी :–
  सध्या सगळीकडे दिवाळीचे शुभ पर्व सुरू असून या धामधुमीत चोपडा
तालुक्यातील वरगव्हाण गावात संदीप संतोष पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला रात्री अचानक आग लागल्याने मात्र त्यांच्यावर लाखों रुपयांचे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.


 याबाबत सविस्तर माहिती अशी की,वरगव्हाण गावातील रहिवासी संदीप संतोष पाटील यांचा मालकीचा गुरांचा गोठा आहे. गावाच्या मध्यावर्तीच्या ठिकाणी असलेल्या या गोठ्याचा वापर बैलगाडी व शेती अवजारे,गुरांचा चारा ठेवण्यासाठी ते करायचे.


दि.२४ सोमवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या मालकीचा या गोठयास भीषण अशी आग लागली.यात त्यांनी गुरांना खाण्यासाठी साठवून ठेवलेली मक्का व ज्वारीची कुट्टी (चारा) तसेच शेती अवजारे खाक झाली.गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली खरी.मात्र या आगीत त्यांचे शेतीसाठी लागणारे शेती अवजारे त्यात २ लाकडी वक्खार,२ लोखंडी नांगर, गोठ्याचे पत्री शेड जळून खाक झाल्याने यात त्यांचे अतोनात असे नुकसान झाले आहे.


ऐन दिवाळीच्या दिवशी रात्री त्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तरी शासन स्तरावरून या घटनेचा पंचनामा करून शासकीय मदत मिळावी अशी मागणी संदीप पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More