
चोपडा औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयास पुन्हा ‘एनबीए’ मानांकन
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाससरकारच्या शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी सर्वोच्च व प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडेशन अर्थातच एनबीए समितीकडून तीन वर्षाचे एनबीए मानांकन मिळाले आहे. यापूर्वी या संस्थेला वर्ष २०१६ मध्ये ‘एनबीए’चे तीन वर्षांचे मानांकन मिळाले होते, आता पुन्हा मानांकन मिळाल्यामुळे श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाहे सलग सहा वर्षे ‘एनबीए’ मानांकन प्राप्त करणारे राज्याच्या ग्रामीण भागातील आणि जळगाव जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज ठरले आहे वयामुळे ‘चोपडा फार्मसी कॉलेज’ची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे., अशी माहिती महात्मा गांधी शिक्षण मंडळचे अध्यक्ष श्री. अड संदीप पाटील यांनी दिली.
२०१६ मध्ये नवीन नियमानुसार ‘एनबीए’च्या कसोटीला सामोरे जाणारे चोपडा कॉलेज हे राज्यातील एकमेव फार्मसी कॉलेज होते. त्यावेळी दोन वर्षांचे मानांकन प्राप्त झाले होते. ही मुदत संपण्याच्या अगोदरच चोपडा कॉलेज ने पूर्तता अहवाल सादर करून पुन्हा एक वर्षाचे मानांकन प्राप्त केले होते. आता मागील तीन वर्षातील प्रत्येक विभागातील प्रवेश संख्या, आणि पीएचडी असणारे शिक्षक, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सलग चार वर्षांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण अशा विविध बाबींचा अहवाल ‘एनबीए’ कार्यालयाला कॉलेजने सादर केला होता. ‘एनबीए’ कार्यपद्धतीनुसार ‘एनबीए’ च्या दोन सदस्यीय समितीने दिनांक २६ मे २०१९ रोजी सर्व बाबींची पडताळणी केली आणि त्यानंतर चोपडा कॉलेजला पुढील तीन वर्षांसाठी ‘एनबीए’ मानांकन दिले आहे.
एनबीए मानांकन झालेल्या विद्यालयांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ तसेच विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी थेट प्रवेशाचा संधी मिळते. वॉशिंग्टन अॅकॉर्ड अंतर्गत येणार्या सर्व योजनांचा फायदा विद्यालयाला, विद्यार्थी व शिक्षकांना उपलब्ध होतो.
‘एनबीए’ मानांकन मिळाल्याबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, अध्यक्ष श्री. अड संदीप पाटील, उपाध्यक्ष सौ. आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, कार्यकारी संचालक श्री देविदास देशमुख, समन्वयक श्री दिलीप साळुंखे यांनी प्राचार्य सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सदस्य व सर्व विध्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

सन १९९२ साली स्थापन झालेल्या चोपडा फार्मसी कॉलेजने विविध उपक्रम, सोयीसुविधा, संशोधन, माजी विद्यार्थी यांचा महाविद्यालया विषयीची बांधिलकी आणि त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा व व्यावसायिक शिक्षणातील गुणात्मक दर्जा, अध्यापन याचे दिल्लीच्या समितीने मूल्यांकन करून ‘एनबीएचे’ मानांकन या महाविद्यालयांने मिळवले आहे.- प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे












