२५ वर्षीय महिलेचा विनयभंग चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

२५ वर्षीय महिलेचा विनयभंग चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहितेचा दारूच्या नशेत असणाऱ्या एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह घरात असतांना दि २३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शिकारी मालज्या पावरा हा दारूच्या नशेत लाकडी दांडका घेवून घरातील मागच्या दाराने येत महिलेच्या पतीच्या अंगावर धावून आला. यानंतर पती घराबाहेर जाताच, संशयित आरोपीने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिकारी मालज्या पावरा याच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास स.फौ. देविदास ईशी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More