अल्पवयीन मुलीचा विनयभंग; अडावद पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; अडावद पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी ३ जणांवर अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विनयभंग करण्यासह पीडितेच्या नातेवाईकांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई व मावशीसह शिवीगाळ करीत मारहाण करून मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी दीपक भीमा ठाकरे, संदीप भीमा ठाकरे व समाधान विक्रम ठाकरे याच्याविरोधात अडावद पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. जगदीश कोळंबे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More