चोपड्याजवळ भीषण अपघात; मामा-भाची जागीच ठार, दोन जखमी…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):–
चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ दुपारी मामा – भाची जागीच ठार झालेत. मयतांमध्ये पाच वर्षीय चिमुकलीचा व ३५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की , दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र. एमएच १९ सीएच ५१७४) ला समोरून येणारा ट्रक (क्र. एचआर ५६ बी ४६८८) ने जोरदार धडक दिली. या अपघातात सहा वर्षीय विधी विनोद कोळी नामक बालिका जागीच ठार झाली आहे तर दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) हे देखील गतप्राण झाले आहेत.



यात एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला देखील गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी प्रभावीत झाली होती. तसेच मयत हा आपल्या बहिणीला घेऊन विरवाडे ता. चोपडा येथून आपल्या घरी दहीदुल्ले ता. धरणगाव कडे जात होता.

कंटेनर क्र. एच आर ५६ बी ४६८८ ग्रामीण पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून चालक व क्लिनर यांना अटक करण्यात आली आहे.घटनास्थळी सपोनि संतोष चव्हाण, पोहेकॉ प्रदीप राजपूत, पोहेकॉ जितेंद्र चव्हाण, पोकॉ प्रमोद पवार, पोना हेमत कोळी आदी कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली . तसेच मयत व जखमींना उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले….














