डॉ शैलेश वाघ महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

*डॉ शैलेश वाघ महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित*

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक डॉ. शैलेशकुमार आबासाहेब वाघ यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


जयसिंगपूर जि. कोल्हापूर येथे पार पडलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सन्मानचिन्ह, शाल व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. प्रस्तुत पुरस्कार इंदोर येथील होळकर राज घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, परिषदेचे अध्यक्ष व्यंकटराव जाधव, विभागीय अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षण व संशोधन क्षेत्रातील कामगिरीनिमित्त परिषदेच्या वतीने पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आलेली होती.


त्यांच्या या गौरवाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा श्रीमती. आशाताई विजय पाटील, सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. एन. एस. कोल्हे, डॉ. किशोर सोनवणे, डॉ. ए. एल. चौधरी, रजिस्ट्रार डी. एम. पाटील व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More