चोपडा विधानसभेची जागा आमचीच – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)…
महाप्रबोधन यात्रा यशस्वी करा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे आवाहन…

चोपडा विधानसभेची जागा आमचीच – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)…
महाप्रबोधन यात्रा यशस्वी करा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे आवाहन…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी) :–


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केल्याने शिवसेनेत माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे व शिंदे असे दोन गट तयार झाले असून, सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यानंतर आयोजित पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यात्रा दि.३ नोव्हेंबर रोजी चोपडा दौऱ्यावर येत असून, संध्याकाळी ६ वाजता त्यांची जाहीर सभा होत आहे.


चोपडा विधानसभेची जागा आमचीच असून, उमेदवारांची चाचपणी सुरु आहे असा दावा उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केला.
उद्धव ठाकरे गटाच्या सेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा ३ नोहेंबर रोजी चोपड्यात येत असून संध्याकाळी ६ वाजता आझाद चौकात जाहीर सभा होणार आहे. यावेळी सेना नेते विलास पारकर व संघटनेचे नेते शरद कोळी उपस्थित राहणार आहेत.

महाप्रबोधन यात्रा व जाहीर सभा यशस्वीतेसाठी विश्रामगृह परिषदेत सेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेचे जुने कार्यकर्ते यांचेशी संपर्क सुरू असून, चोपड्यासह गाव जिल्ह्यातील बऱ्याच लोकांची भेट घेऊन त्यांना पक्षात परतण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सूतगिरणी ,बाजार समिती व साखर कारखान्यासह नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका मित्र पक्षांना सोबत घेऊन महविकास आघाडी म्हणून लढू त्या संदर्भात पक्षीय पातळीवर चर्चा सुरू आहे. पक्षा कडून आदेश आल्यास महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या नेत्यांना जाहीर सभेत बोलविणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना ताकदीनिशी काम करणार आहे. येथील विधानसभेची शिवसेनेची असल्याने या जागेवर आमचा अधिकार असून तालुक्यातील काही इच्छुकांनी पक्षाशी संपर्क केलेला आहे. तसेच आमच्या गटाकडून मोठा प्रतिसाद असून सहानुभूतीची लाट असल्याचे ते म्हणाले.


पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी, माजी नगरसेवक किशोर चौधरी, उपशहर प्रमुख हरीश पवार शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, युवासेनेचे धिरज गुजराथी, महेंद्र भोई, शशिकांत कन्हैये, कमलेश बडगुजर, प्रकाश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More