बारामती ऍग्रो संचालित चोसाकाचे यंदा ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट…#आज पासून दुसरा गळीत हंगामास सुरूवात..

चोसाकाचे यंदा ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट…
आज पासून दुसरा गळीत हंगामास सुरूवात


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


बारामती ऍग्रो संचलित चोसाकाचा दुसऱ्या वर्षीचा गाळप हंगाम आज दि.२ पासून सुरू झाला. यंदा चोपडा तालुक्यासह कार्यक्षेत्रातील सुमारे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट बारामती अॅग्रो युनिटने ठेवले आहे. यंदा कारखान्याकडून शेतकऱ्यांना किती एफआरपी मिळतो, याची उत्सुकता आहे.


गेल्या वर्षापासून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने चोसाका भाडे तत्वावर घेतला आहे. पहिल्याच वर्षी बारामती अॅग्रो युनिटने २ लाख ९२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून, तीन लाख मेट्रिक टन साखर निर्मिती केली होती.गेल्या वर्षी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे २ हजार ३१ रुपयांचा भाव दिला होता. आज पासून कारख्यानाचा दुसरा गाळप हंगाम सुरु झाला आहे.


चोपडा तालुक्यात बारामती अॅग्रो युनिट क्रमांक – ४ च्या कार्यक्षेत्रात ९ हजार एकर ऊस चोपडा तालुक्यात उभा आहे. तर यावल, धरणगाव, जळगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तसेच शिरपूर या तालुक्यातूनही ऊसाची आवक होणार आहे. कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता अडीच हजार मेट्रिक टन आहे. तर दोन्ही शिफ्ट मधून ३ हजार ते ३२०० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप करण्याचे नियोजन आहे.चोसाकाने २००६-०७ मध्ये सर्वाधिक ५ लाख ४८ हजार ३२५ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते.


बारामती ॲग्रोने इतर कारखान्यांपेक्षा वाढीव भाव द्यावा .ऊस तोडणी वेळी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी संघटनेने व्यक्त केली. आजच्या गळीत हंगाम कार्यक्रमास शेतकऱ्यांची उपस्थिती अत्यंत नगण्य दिसून आली.


मोळी टाकण्याचा मान कारखान्याचे कर्मचारी प्रशांत कंखरे व सौ. सुवर्णा कंखरे यांना देण्यात आला.सदर कार्यक्रम प्रसंगी बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे , प्रा अरूण गुजराथी ( माजी विधानसभा अध्यक्ष ) , कैलास पाटील ( माजी आमदार ) , ॲड घनःश्याम पाटील ( माजी चोसाका चेअरमन ) , प्रा.दिलिपराव सोनवणे (माजी शिक्षक आमदार ) , ॲड संदीप पाटील (माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय ) , सौ इंदिराताई पाटिल , भारती बोरसे , अतुल ठाकरे (चोसाका चेअरमन), गिरीष आप्पा पाटिल , जीवन चौधरी यांसह शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More