ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा खराब रस्त्यांच्या संदर्भात डॉ.चंद्रकांत बारेला
मित्रपरिवाराची निवेदनाद्वारे मागणी..

ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
खराब रस्त्यांच्या संदर्भात डॉ.चंद्रकांत बारेला
मित्रपरिवाराची निवेदनाद्वारे मागणी

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्कचोपडा ( प्रतिनिधी ) –

चोपडा तालुक्यातील चारही बाजूचे दळण – वळणाचे रस्ते खड्डेमय झाले असून रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हा विषय संशोधनाचा झाला आहे.यामुळे दररोज कुठेतरी अपघात होऊन माणसं जखमी,जायबंदी होत असून अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांची कामं निष्कृष्ट दर्जाची असल्याने सदर
अपघात घडत आहेत,म्हणून संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली डॉ.चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली.येथील सा.बा.विभागाचे उपविभागीय अभियंता विरेंद्र राजपूततसेच तालुक्याचे तहसीलदार अनिल गावीत यांना तश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की,रस्त्यांच्या कामात मलिदा खाण्याच्या वृत्तीने कामांची गुणवत्ता शून्य झाली आहे,पर्यायाने होणाऱ्या अपघातात
अनेकांना कायमचे अपंगत्व तर काही जखमी होत आहेत,आठवड्यात एखादा तरी मृत्यू या अपघातामुळे होत आहे.अनेकवेळा यासंदर्भात
अनेकांनी निवेदनाद्वारे मागणी करून,मोर्चे काढूनही प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे.रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या घटनेत संबंधित ठेकेदारावर फोजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत,जखमींना तात्काळ आर्थिक मदत मिळावी,येत्या आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला,सचिन पाटील,अमोल राजपूत,शाम जाधव, ईश्वर सूर्यवंशी,वसंत कोळी,दिलावर तडवी, दीपक वानखेडे,सचिन पाटील,राहुल अहिरे, बापू मोरे,ईश्वर भिल,अल्केश महाजन,समाधान महाजन व डॉ.चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More