एरंडोल विभागीय जलतरण स्पर्धा पंकज महाविद्यालयात संपन्न…

एरंडोल विभागीय जलतरण स्पर्धा पंकज महाविद्यालयात संपन्न…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांव अंतर्गत एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालय जलतरण स्पर्धा पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे संपन्न झाल्या.


या जलतरण स्पर्धेत दहा महाविद्यालयांतील ५५ खेळाडूंनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.आर.आर.अत्तरदे यांनी केले. या प्रसंगी एरंडोल विभागाचे सचिव डॉ.देवदत्त पाटील,डॉ.संजय भावसार,डॉ.हर्ष सरदार,डॉ.शैलेश पाटील,प्रा.सचिन पाटील,श्री सचिन पाटील मारवड आदी उपस्थित होते.या उदघाटन प्रसंगी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.विजय के.पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More