तापी सहकारी सूतगिरणीची निवडणूक रंगणार…# २१ जागांसाठी तब्बल १६३ नामांकन अर्ज दाखल…

तापी सहकारी सूतगिरणीची निवडणूक रंगणार…
२१ जागांसाठी तब्बल १६३ नामांकन अर्ज दाखल…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा येथील तापी सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २१ जागांसाठी तब्बल १६३ जणांनी आपले उमेदवारी दाखल अर्ज केले आहेत.


यात कापूस उत्पादक मतदार संघात एकूण १५ जागांसाठी १०० तर बिगर कापूस उत्पादक मतदार संघात एका जागेसाठी १२, इतर मागासवर्गीय मतदार संघात एका जागेसाठी २३, महिला राखीव मतदार संघात दोन जागेसाठी एकूण १५, अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी ६, भटक्या विमुक्त एका जागेसाठी ७ असे एकूण १६३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या पाच दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ होती.


नामनिर्देशन पत्रांची ७ रोजी दुपारी १२ वाजता सूतगिरणीच्या चोपडा शहरातील कार्यालयात छाननी करण्यात आली. तर ९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २४ रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ४ या वेळी मतदान प्रक्रिया पार पडेल. तर ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, सद्यस्थितीत गेल्या ५ वर्षापासून तापी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन म्हणून माजी आमदार कैलास पाटील हे कार्यभार सांभाळत आहेत. मात्र यावेळी माजी आमदार कैलास पाटील यांना शह देण्यासाठी भाजपा व शिंदे गट मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे तालुक्यांत बोलले जात आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More