रामभक्त शबरी माता बद्दल अपशब्द बोलल्या प्रकरणी सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा…
शबरी माता आदिवासी भिल्ल विकास संस्थेची मागणी….
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
२०१५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोहात नागपूर या ठिकाणी सुषमा अंधारे यानी रामभक्त शबरी माता यांच्या विषयी अपशब्द वापर केला होता की ,१४ वर्ष वनवास भोगत असताना रामाचे व शबरीचे अनैतिक संबंध होते …असे घाणेरडे वक्तव्य करून राम भक्त शबरी माता आदिवासीचे दैवत बद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान व विटंबना केल्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.


जरी त्यांनी सन २०१५ मध्ये वक्तव्य केले असेल परंतु हे व्हिडिओ आजच्या स्थितीत व्हायरल झाल्यामुळे आमच्या आदिवासी समाजाच्या सद्य स्थितीत निदर्शनास आले आहे. असे कोणीही येतात आणि आपली प्रसिदधी मिळविण्यासाठी आदिवासी व आदिवासी देवतांचा अपमान व विटंबना करू पाहतात. यापुढे कोणीही आदिवासी व आदिवासी देवतांचे विटंबना करणार नाही यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या गटातील उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत व आदिवासीचे दैवत शबरी माता यांची विटंबना केल्यामुळे गुन्हा दाखल व्हावा म्हणून शबरी माता आदिवासी भिल्ल विकास संस्थे मार्फत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदिप दूनगहू यांना निवेदन देण्यात आले आहे…..

गुन्हा दाखल झालानाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी समुदाय रस्त्यावर उतरेल आणि मोर्चे, आंदोलन व निदर्शने करतील. याला जबाबदार पोलीस प्रशासन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेहे जबाबदार असतील असा इशारा देण्यात आला आहे…













