बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात., चोपडा शहर पोलिसांची कारवाई…

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात….
८८००० रू किमतीचा मुद्देमाल जप्त…


महाराष्ट्र9न्यूज चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा शहरांतील हॉटेल सुयोग जवळ काही इसम आपल्या जवळ बनावट नोटा आहेत हे माहीत असूनही बनावट नोटा चलनात आणत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने चारही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


सविस्तर वृत्त असे की, शहरातील हॉटेल सुयोग जवळ सांयकाळी ५:३० वाजेच्या सुमारास १) विजय सुरेश निकुंभ वय २६ रा खर्दे ता शिरपुर जि धुळे. २) किरण रमेश शिंदे वय ३३ रा सांगवी ता शिरपुर ह.मु. सिध्दार्थ नगर शिरपुर व त्यांचे ओळखीचे आरोपी ३) शंकर पुनमचंद वडर रा वाडी ता शिरपुर व ४) संतोष वडर पुर्ण नाव माहित नाही रा. शिंदखेडा चारही आरोपीतांनी संगनमताने भारतीय अर्थव्यवस्थेस क्षती पोहचविण्याचे इरादयाने १०००/- रुपये त्यात ५००/- रुपये दराच्या २ बनावट भारतीय चलनी नोटा आरोपी विजय सुरेश निकुंभे व किरण रमेश शिंदे यांनी त्यांचे कब्न्यात बाळगल्या व काही नोटा बनावट असल्याचे माहित असतांना देखील त्या ख-या असल्याचे भासवुन व्यवहारात वितरीत करीत असतांना मिळुन आले म्हणुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात गु र नं सी सी टी एन एस ४४८/२०२२ भा द वि कलम २४० ,२४३, ४८९ ब , ४८९ क ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सदर आरोपींकडून ३१००० हजार रुपये रोख ( भारतीय चलनातील खऱ्या नोटा ) , १००० रूपये रोख त्यात ५०० रू दराच्या २ बनावट नोटा , दोन मोबाईल हँडसेट , ५०००० रू किमतीची मोटार सायकल असा एकूण ८८००० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास कृषिकेश रावले ( सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग चोपडा ) , अवतारसिंग चव्हाण ( पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चोपडा ) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More