स्थानिक गुन्हे शाखे कडून मोटार सायकल चोरी करणारे २ आरोपी जेरबंद… १५ मोटारसायकली हस्तगत…

स्थानिक गुन्हे शाखे कडून मोटार सायकल चोरी करणारे २ आरोपी जेरबंद… १५ मोटारसायकली हस्तगत…


महाराष्ट्र9न्यूज चोपडा प्रतिनिधी :-


जळगाव जिल्हयांत मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने एम राजकुमार ( पोलीस अधीक्षक जळगाव ) व चंद्रकांत गवळी ( अपर पोलीस अधीक्षक ) रमेश चोपडे ( अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव ) यांनी किसनराव नजनपाटील ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव ) यांना सूचना निर्गमीत करुन केल्या.


किसनराव नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गुप्त माहिती मिळाली होती की, अडावद ता. चोपडा येथील राहणारा दिपक संजय शेटे व नविद शेख इजाज हे मोटार सायकल चोरी करुन त्याची कमी किंमतीत विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने किसनराव नजनपाटील यांनी त्यांचे अधिनस्त पोलिस कर्मचारी गोरखनाथ बागुल, संदिप रमेश पाटील, अश्रफ शेख, संदिप सावळे, प्रविण मांडोळे, परेश महाजन, रविंद्र पाटील,लोकेश माळी ,भारत पाटील, प्रमोद ठाकूर अशांचे पथक तयार करून त्यांना अडावद ता. चोपडा येथे रवाना केले असता पथकाने आरोपी दिपक संजय शेटे वय २० रा. प्लॉट भाग, अडावद ता. चोपडा व नविद शेख इजाज वय २३ रा. मनियार अळी, अडावद ता. चोपडा यांना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकल संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी चोपडा, अमळनेर, यावल, धुळे जिल्हयातील शिरपूर, थाळनेर व मध्यप्रदेश राज्यातील बलकवाडा जि. खरगोन येथून मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत. सदर आरोपीतांनी चोरी केलेल्या १४ गुन्ह्यांमधील एकूण १५ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More