राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण 731 पैकी 36 तर दाखलपूर्व प्रकरणे बँक,बीएसएनएल व म.रा.वी. मंडळ च्या दाखलपूर्व 3040 प्रकरणापैकी 60 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 1 कोटी 24 लाख 93 हजार 02 रुपये झाली

*राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण 731 पैकी 36 तर दाखलपूर्व प्रकरणे बँक,बीएसएनएल व म.रा.वी. मंडळ च्या दाखलपूर्व 3040 प्रकरणापैकी 60 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 1 कोटी 24 लाख 93 हजार 02 रुपये झाली.*


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी)–

मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये दि.12 नोव्हेंबर 2022 शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते यात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण 731 पैकी 36 तर दाखलपूर्व प्रकरणे बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बीएसएनएल, म.रा.वी.मंडळच्या दाखलपूर्व 3040 प्रकरणापैकी 60 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 1 कोटी 24 लाख 93 हजार 02 रुपयांची झाली.


सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला सुरवात झाली. यावेळी एका पॅंनलवर सह दिवाणी न्यायाधीश श्री.आर. बी. राऊत यांच्या समोर पंच म्हणून ॲड. एन. बी. चौधरी, चोपडा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सी.एच. पाटील, सचिव ॲड. पी. एच. पाटील, ॲड. डी. सी. पाटील, ॲड. पी. बी. काबरे, ॲड.संदीप एन. पाटील, ॲड. सी.बी. सोनवणे, ॲड. विनीत नाईक, ॲड. एस.एम. बारी, ॲड.एस.एफ.जैन, ॲड. ए. व्ही. जैन, ॲड.एस. डी. सोनवणे, ॲड.उमेश बी.पाटील, ॲड. सी. आर. निकम, ॲड. एस. डी. पाटील, ॲड.अंबादास एस. पाटील , ॲड. आर. एस. बाविस्कर, ॲड. बी.सी. पाटील, ॲड. एस. आर. शर्मा, ॲड. जे. आर. पाटील, ॲड. ए. ए. हुसेन, ॲड.नितिन महाजन, ॲड. भैय्या पाटील, ॲड.एच. एम. सैय्यद, ॲड. एस. आर. शर्मा, ॲड. विलास बाविस्कर, ॲड. एम. एम. बाविस्कर,ॲड. एच.डी. सोनवणे,ॲड. आय. आर. पाटील, ॲड. ए. ए. सैय्यद हजर होते. चोपडा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे 731 ठेवण्यात आले होते त्यातून धनादेश अनादर प्रकरणे 26 व कौटुबिक वादाचे 03 प्रकरण व दिवाणी प्रकरणे 07अशी एकूण 36 प्रकरणें निकाली काढण्यात आले यात 40 लाख 63 हजार 53 रुपये वसूली झाली. बँक, मराविम व बीएसएनएल यांच्या दाखल पूर्व प्रकरणे एकूण 3040 प्रकरणातून 60 प्रकरणे निकाली झाले यात 84 लाख 29 हजार 949 रुपये वसूल करण्यात आले. अशी एकूण 1 कोटी 24 लाख 93 हजार 02 रुपये वसूल करण्यात आले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, सहाय्यक अधीक्षक एस. जी. नगरकर, लघुलेखक ए. ए. माळी, वरीष्ठ लिपिक ए.एच.परदेशी, दिनेश राजपूत, कनिष्ठ लिपिक राजेंद्र ठाकूर, पी. डी. पाटील, पी. ए. सोनवणे, एन.डी. कुलकर्णी, एम.बी.बाविस्कर, एस.के. पाटील, डी. एम. महाजन, शिपाई प्रवीण पाटील, राहुल पाटील व दिपक महाजन आदिंनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More