तब्बल ४० वर्षानंतर चोपडा पिपल्स बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान… चुरशीची लढत…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-
चोपडा तालुक्याच्या इतिहासात, मागील ८० वर्षांपासून आर्थिक धमणी म्हणून “दि चोपडा पीपल्स को. ऑप. बँक लि. चोपडा जि.जळगांव” या संस्थेने अनेक परिवारांना योग्य वेळी, सुयोग्य मोबदल्यात आर्थिक मदत केली आहे.
या मदतगार संस्थेची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी “संचालक मंडळाची निवडणूकसाठी मतदान प्रक्रिया आज प्रताप विद्या मंदिरात पार पडत आहे.सचोटीने चालणारी बँक… प्रत्येकाच्या संकटसमयी धावून येणारी बँक … म्हणून ओळख असलेल्या बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनल व “परिवर्तन पॅनल” आमने सामने उभे आहेत.


आता पर्यन्त सदर बँकेवर चंद्रहास गुजराथी यांची एक हाती सत्ता राहिली आहे. प्रथमच गूजराथी प्रवीण विठ्ठलदास , पोतदार महेश बाबुलाल , पारीख विजयलाल दगडुसा यांनी सत्ताधाऱ्यांपुढे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आव्हान उभे केले आहे.

आर्थिक सुबत्ता असलेली चोपडा पीपल्स बँकेची सर्वसाधारण निवडणूक प्रक्रिया आज होत आहे . तब्बल ४० वर्षानंतर प्रथमच निवडणूक होत आहे. अतिशय कमालीची चुरस दिसून येत आहे. सर्व मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे व वयोवृद्ध मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करताना दिसून येत आहेत. सहकार पॅनल ८ जागा लढवीत आहे तर परिवर्तन पॅनल ३ जागा लढवीत आहे .सदर निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के पी पाटील हे काम पाहत आहेत…..













