चहार्डी विद्यालयात चाचा नेहरू जयंती उत्साहात साजरी…

चहार्डी विद्यालयात चाचा नेहरू जयंती उत्साहात साजरी…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


भाऊसो शामराव शिवराम पाटील विद्यामंदिर चहार्डी येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३३ व्या जयंती व बाल दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वेशभूषा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


तसेच वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेला प्रत्येकी १०१ रुपयाचे पारितोषिक देवून सदर विद्यार्थ्याना सन्मानित करण्यात केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर.सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे प्रा.संजय पाटील होते. पर्यवेक्षक सी. एस. पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी आर घुगे व इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.सी.पाटील, एस. एस. बाविस्कर , डी.बी.धनगर यांसह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More