*ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाल दिनानिमित्त आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन*
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल,चोपडा मध्ये बाल दिनानिमित्त आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये खाण्याच्या विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते.


पाणीपुरी, विविध प्रकारचे चाट, सँडविच, चहा, कॉफी, आप्पे, इडली सांबार, चना रोस्ट, कचोरी, समोसा, चायनीज आणि इटालियन खाद्यपदार्थ तसेच बेकरीचे विविध पदार्थ यांसारख्या विविध पदार्थांचे स्टॉल स्वतः विद्यार्थ्यांनी हाताळले. सोबतच विविध खेळांचे स्टॉल देखील होते. संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बालदिनाच्या अनुषंगाने शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. या विविध खाद्यपदार्थांचे परीक्षण नीता दुर्गेश जयस्वाल, पूजा नरेंद्र तोतला, रूपाली दीपेश काबरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका साक्षी बिडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सांस्कृतिक समितीच्या प्रमुख दिपाली नरेंद्र पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.














