पोलिस कर्मचाऱ्याची गाय इनोव्हातून चोरीला?…चर्चांना उधाण… चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिस कर्मचाऱ्याची गाय इनोव्हातून चोरीला?…चर्चांना उधाण…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी) :-


चोपडा उपविभागीय पोलिस कार्यालयात कर्तव्यास असलेले पोलिस कर्माचारी श्रीकांत गांगुर्डे हे ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील पोलिस लाईन मध्ये वास्तव्यास आहेत. श्रीकांत गांगुर्डे हे पक्षी , प्राणी प्रेमी आहेत. त्यांनी गाय पाळली होती , सदर गाय रात्रीचा अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी चोरून नेली आहे.


सविस्तर वृत्त असे की , श्रीकांत गांगुर्डे या पोलिस कर्मचाऱ्याची गाय पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
श्रीकांत गांगुर्डे यांनी नेहमी प्रमाणे आपली गाय घरासमोर बांधली होती.


पहाटेच्या सुमारास गांगुर्डे हे घराबाहेर आले असता त्यांना गाय दिसली नाही. त्यानंतर त्यांनी परिसरात गायीचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही. त्यांनी आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत . सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात लांब ठिकाणी इनोव्हा गाडी उभी असल्याचे दिसून येत असल्याने चोरट्यांनी सदर गाय इनोव्हा गाडीतून चोरीला नेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात सी सी टी एन एस भाग ५ गु र न ४५६ / २०२२ भा द वि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More