माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केला
चंद्रहासभाई गुजराथी यांचा सत्कार
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा ( प्रतिनिधी )
चोपडा पिपल्स बँकेच्या निवडणुकीत राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी प्रणित सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला, चंद्रहासभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने हा विजयश्री खेचून आणला.


महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन गुलाबराव देवकर यांनी काल दि.१५ रोजी खास चोपडा येथे येऊन सर्व विजयी उमेद्वारांचे व प्रातिनिधिक स्वरूपात चंद्रहासभाई गुजराथी यांचे शाल, हार,श्रीफळ देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी चोपडा तालुक्याचे माजी आमदार कैलासबापू पाटील, बँकेचे संचालक सुनील जैन, नेमीचंद जैन,डॉ.चंद्रकांत बारेला, आदी उपस्थित होते, यावेळी भविष्यात येणाऱ्या निवडणुका, जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची,सुतगीरण्यांची स्थिती यावर चर्चा करण्यात आली.














