भरदिवसा आनंद सुपर शॉपी मधून भामट्यांनी १६ हजार रुपये केले चोरी;#  शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल! #घटना सीसीटीव्ही मधे

भरदिवसा आनंद सुपर शॉपी मधून भामट्यांनी १६ हजार रुपये केले चोरी;#  शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल! #घटना सीसीटीव्ही मधे..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा(प्रतिनिधी)

चोपडा दि. २१ – शहरातील धरणगांव रस्त्यावरील आनंद सुपर शॉपीमध्ये दि. २० /११/ २०२२ रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात इसमांच्या टोळक्याने कॕश काऊंटरमधून चक्क सोळा हजार रुपये लांबविल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात ०३ इसमांविरुद्ध चोरीचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील धरणगांव रस्त्यांवरील किराणा वस्तुचे दुकान असलेले आनंद सुपरशॉपी येथे सायंकाळच्या दरम्यान तीन अज्ञात इसमांनी प्रवेश केला. त्यानंतर वस्तू घेण्याचा बनाव करीत. व कॕशियरला बोलण्यात गुंतवून एका भामट्याने पाचशे रुपयांचे ३२ नोटांचे बंडल असे एकुण १६,०००/- रुपये लांबवले. यानंतर तेथून ते पसार झाले. रात्री हिशोबाच्या वेळी हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर सीसीटिव्हि तपासून बघितल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलीसांना कळविण्यात आले. पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण व इतरांनी उशिरा रात्रीपर्यंत घटनास्थळी पाहणी केली. आरोपी सीसीटिव्हि फुटेज मध्ये कैद झाले आहेत. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात ०३ इसमांनिरुद्ध सीसीटिएनएस भाग ५ गुरनं. ४७९/२०२२ अन्वये भादंवि ३७९, ४१९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. संतोष ज्योतीराम पारधी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More