महेंद्र पिकअप गाडीची एकास मागून ठोस… एक गंभीर जखमी….
चोपडा प्रतिनिधी :-
वेले गावाचे चहार्डी गावी जाणाऱ्या साखर कारखाना फाट्यावर महींद्रा पिकअप वाहन क्र. MH-19 S-5956 वरील चालक नाव – गाव माहीत नाही हा त्याचे ताब्यातील वाहन धरणगांव कडुन चोपडा कडेस भरधाव वेगात चालवीत घेवुन जात असतांना त्याने फिर्यादी हर्षल वसंत धोबी यांचे वडील वसंत एकनाथ धोबी वय.50 रा.वेले ता. चोपडा हे रोडाचे बाजुला उभे असतांना त्यांना समोरुन जोराची ठोस मारुन अपघात करुन सदर अपघातामध्ये वसंत एकनाथ धोबी यांच्या गंभीर दुखापतीस कारणीभुत असतांना व अपघाताची खबर न देता घटनास्थळावरुन पळुन गेला म्हणुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात भाग 5 , सी सी टी एन एस 482/2022 भादवी कलम 279,337,338, MV ACT 184,134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सदर गुन्ह्याचा अधिक तपास चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. मधुकर पवार करीत आहे.














