भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांचा चोपड्यात जाहिर निषेध व जोडे मारो आंदोलन…

भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांचा चोपड्यात जाहिर निषेध व जोडे मारो आंदोलन…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी ):-


छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी या दोघांचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय छावा, मराठा महासंघ, तथा सर्व समाजातील, धर्मातील, पक्षातील, शिवप्रेमी मार्फत जाहिर निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान कारक वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
तसेच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती असे बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांचा देखील यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.


यापुर्वीही राज्यपालांनी समर्थ के बिना शिवाजी कौन पुछेंगा असे वक्तव्य करून छत्रपती शिवरायांचा अवमान केला होता. तसेच सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबतीतही अवमान कारक वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यपाल हे शिवद्रोही असून वांरवार बहूजन महापुरुषांची बदनामी करत आहेत .त्यामुळे राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सदर आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांनी देखील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या फोटोंना जोडे मारण्याचा आनंद लुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More