चोपडा शहरांतील सराईत दोन गुन्हेगार ६ महिन्यांसाठी हद्दपार…

चोपडा शहरांतील सराईत दोन गुन्हेगार ६ महिन्यांसाठी हद्दपार…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोपडा शहरात राहणारे हिस्ट्रीशीटर तसेच सराईत गुन्हेगार भैय्या मंगल पाटील वय. २९ रा. अरुण नगर व वैभव उर्फ टकल्या गोपाल गवळी रा.बारीवाडा यांच्या वर चोपडा शहर पोस्टेला विविध मालाविरुध्दचे व शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर दोन्ही इसमांवर वारंवार प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांचे वर्तनात कोणतेही सुधारणा झालेली नव्हती.

प्रतिबंधात्मक कारवाई नंतर देखील त्यांनी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला होता. दोन्ही इसमांकडुन भविष्यात मोठा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच गंभीर गुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्याने दोन्ही इसमांविरुध्द चोपडा शहर पोस्टे मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या कडे हद्दपार करणेबाबत प्रस्ताव पाठवीण्यात आला होता. सदर दोन्ही इसमांनी केलेल्या गंभीर कृत्याचा व गुन्ह्याचा विचार करुन भविष्यात एखादी मोठी अनुचित घटना घडु नये सदर इसमांवर कायद्याचा धाक राहावा म्हणुन उपविभागीय अधिकारी अमळनेर यांनी दोन्ही इसमास जळगांव व धुळे जिल्ह्यातील चोपडा, यावल, शिरपुर, अमळनेर, धरणगांव, जळगांव, धुळे येथुन ६ महीन्या करीता हद्दपारीचे आदेश पारीत केले आहेत.


तसेच गावातील इतर सराईत गुन्हेगार व उपद्रवी लोकांवर देखील याच प्रकारची कठोर कारवाई चोपड़ा शहर पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येणार आहे .सदर दोन्ही गुन्हेगारांवर हद्दपारीचे आदेशाची अंमलबजावणी झाले नंतर दोन्ही गुन्हेगार चोपडा, यावल, शिरपुर, अमळनेर, धरणगांव, जळगांव, धुळे तालुक्याच्या हद्दीत कोणालाही आढळुन आल्यास तात्काळ चोपड़ा शहर पोलीस स्टेशनला सूचित करण्याचे आवाहन चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More