सर्वच सभासद अरुणभाईंच्या घरातलेच आहेत का ? अरुणभाईंच्या वक्तव्याला आ. मंगेश चव्हाण यांचे प्रत्युत्तर… चोपडा सूतगिरणी प्रकरण…

सर्वच सभासद अरुणभाईंच्या घरातलेच आहेत का ? अरुणभाईंच्या वक्तव्याला आ. मंगेश चव्हाण यांचे प्रत्युत्तर… चोपडा सूतगिरणी प्रकरण…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


भाजपवाल्यांनी चोपडा सूतगिरणीमध्ये एक तरी सभासद बनवला असेल तर मला दाखवा असा सवाल प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी लासुरच्या सभेत केला होता.
भाजप पैनल चे ‘सूतगिरणी बचाव’ हा शब्द मला आवडला नाही. सहकारात राजकारण नको . निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न केले मात्र ती होऊ शकले नाही .चोपडा तालुक्यात सूतगिरणी मध्ये सभासद करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्याने एक तरी सभासद बनवला असेल तर मला दाखवा असे जाहीर आव्हान विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी लासुर येथील सहकार पॅनलच्या मेळाव्यात बोलताना केले होते .


त्यास आ. मंगेश चव्हाण यांनी जोरदार उत्तर देत म्हटले की ,सूतगिरणीचे सर्वच सभासद अरुणभाईंच्या घरातलेच आहेत का ? असा प्रती सवाल त्यांनी यावेळी केला . सूतगिरणी उभारणीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक स्थानिक कार्यकर्ते ,पदाधिकारी व नेत्यांच्या सहभाग व योगदान राहिले आहे. सूतगिरणी हिताची कामे केली असतील तर मतदार निश्चितच विचार करतील. शेवटच्या शेतकरी, शेवटच्या मतदार समाधानी असणे आवश्यक आहे. शेतकरी बचाव पॅनल हे नाव देण्यामागचे कारण संदर्भात माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके म्हणाले की ,चोपडा सहकारी साखर कारखाना सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात होता पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कारखान्याची वाट लावली .आज सदर कारखाना बारामती ॲग्रोला भाडे तत्वावर देण्याची वेळ आली तशीच वेळ भविष्यात सूतगिरणीवर देखील येईल व भविष्यातील सूतगिरणी देखील भाडे तत्वावर देण्याचा त्यांच्या मनसूबा असल्याचे ते म्हणाले.

तापी सूतगिरणीवर आज २२ कोटी रुपये कर्ज असल्याचे सूतगिरणीचे चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील यांनी सांगितले असल्याचे म्हाळके म्हणाले . त्यामुळे सूतगिरणीचा बचाव करणे गरजेचे असल्याचे आणि त्यामुळे आमच्या पॅनलला सूतगिरणी बचाव पॅनल नाव दिले असल्याचे ते आपल्या मनोगतात म्हणाले. जर अरुणभाईंनी सर्वच सभासद केले आहे तर त्यांनी त्यांच्या सभासदांच्या जोरावर निवडून यावे असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More