महिलेने ग्रामसेवकाची कॉलर पकडत, धक्काबुक्की करत दिली मारहाणीची धमकी!# चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…!

महिलेने ग्रामसेवकाची कॉलर पकडत, धक्काबुक्की करत दिली मारहाणीची धमकी!# चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…!

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क, चोपडा (प्रतिनिधी)

दि. ०३ नोव्हें रोजी चोपडा तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायत येथे मासिक सभा सुरु असतांना कोमलबाई बापुराव पाटील रा. चहार्डी यांनी विनापरवागगी मासिक सभेत प्रवेश केला. ग्रामसेवक एस. आर. पारधी यांच्यामुळे रोजंदारी कामावरुन कमी केले व पेपरात नाव आले त्यामुळे बदनामी झाली या कारणावरुन वाद करुन ग्रामसेवक यांची शर्टाची कॉलर पकडुन धक्का बुक्की करीत मारहाण करण्याची धमकी दिली व शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून कोमलबाई बापुराव पाटील यांचे विरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुकदेव रामसिंग पारधी वय – 47 धंदा – नोकरी (ग्रामविकास अधिकारी) रा. वृंदावनधाम, चोपडा जि. जळगांव यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली की, चहार्डी ग्रामपंचायतीला जुलै 2020 पासुन ग्रामविकास अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे. चहार्डी ग्रामपंचायत येथे दैनदिन कामकाजाकरीता कोमलबाई बापुराव पाटील, धर्मराज रमेश खैरनार इत्यादी कर्मचारी यांना सरंपच यांच्या अधिकाराने रोजंदारीने कामावर ठेवण्यात आले होते. यापैकी कोमलबाई पाटील यांनी ग्रामपंचायत चहार्डी येथे रोजंदारीने काम करीत असतांना सरंपच किंवा ग्रामसेवक यांच्याकडुन कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी न घेता स्वतः तसेच तिच्यासोबत इसम नामे योगिनी मधुकर पाटील व गोपाल धनराज कोळी या व्यक्तींच्या नावे ग्रामपंचायत गावठाण जागेवर नमुना क्रंमाक 8 वर नोंदवुन घेतल्याचे निर्दशनास आल्याने कोमलबाई पाटील यांना दिनांक 30/11/2022 रोजीच्या ग्रामसभेत ठराव करुन रोजंदारी कामावरुन कमी करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More