विश्व मानव रुहानी केंद्रातर्फे मानव सेवा तिर्थास साडे तीन लाखांचे साहित्य वाटप…

विश्व मानव रुहानी केंद्रातर्फे मानव सेवा तिर्थास साडे तीन लाखांचे साहित्य वाटप…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा( प्रतिनिधी) :-


चोपडा तालुक्यांतील वेले येथील मानव सेवा तीर्थ बेवारस मनोरुग्णासाठी देवदूत म्हणून कार्य करीत आहे. रस्त्यावर बेवारस स्थितीत फिरणाऱ्या मनोरुग्णांना मानव सेवा तीर्थ केंद्रात आणून त्यांची सर्व प्रकारची सेवा निःशुल्क पद्धतीने केली जाते. सदर संस्था देणगीदार , दाते यांच्या सहकार्याने हे धाडसी कार्य करीत आहे.


विश्व मानव रूहानी केंद्र ही सेवाभावी आणि आध्यात्मिक संस्था आहे, ही संस्था संत बलजीतसिंह जी यांनी शिकवलेल्या नैतिक जिवन, आध्यात्म ध्यानावर आधारित कार्यक्रम आयोजित करते आणि लोककल्याणासाठी विविध सामाजिक सेवा कार्य करते, कोविड- 19 महामारीचा काळातही संस्थेतर्फे विविध राज्यांमध्ये पूर्ण ऊर्जा आणि उत्साहाने धर्मदाय कार्य केले होते.


विश्व मानव रूहानी केंद्र शाखा अमळनेर व चोपडा, जिल्हा जळगाव तर्फे मानव सेवा तीर्थ नरेंद्र नगर वेले येथील मनोरुग्ण प्रभूंना स्वेटर, ब्लॅकेट, गहु, तांदुळ, तूर डाळ, खाद्य तेल, पोहे, साखर, रवा, मीठ, मठ, हरबरा, चहा पावडर, शेंगदाणे, उडीद डाळ, चवळी, गुळ, बेसन, मठ डाळ, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, जिरे, खोबरेल तेल, दंत मंजन, अंघोळीचे साबण, कपडे धुण्याचे साबण, पाउडर, स्वेटर व कंबल मोफत पुरविण्यात आले, जेणे करून तेथे राहणाऱ्या गरजू लोकांना सदर वस्तू वापरता येतील.


सदर कार्यक्रम प्रसंगी हेमंत निकम मुख्याधिकारी चोपडा नगर परिषद, जिवन चौधरी गट नेता नगर परिषद चोपडा, युवराज चौधरी सदस्य विश्व मानव सेवा केंद्र. रविन्द्र बोरसे निवृत्त पोलिस उपनिरीक्षक मुंबई यांचा हस्ते स्वेटर, ब्लँकेट, तीन महिन्यांचा किराणाचे वाटप करण्यात आले.
मानव सेवा तीर्थ केंद्राची सविस्तर माहिती केंद्राचे प्रमुख एन आर पाटील यांनी दिली. सदर प्रसंगी त्यांनी केंद्रासाठी जागेची देखील मागणी केली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More