पवन साळुंखे आरोपी कडून ५ मोटार सायकली हस्तगत… चोपडा शहर पोलिसांची कारवाई…

पवन साळुंखे आरोपी कडून ५ मोटार सायकली हस्तगत… चोपडा शहर पोलिसांची कारवाई…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा शहर पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव कडील भाग ५ गुन्हा रजि नं ५०५/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील अटकेतील आरोपी पवन संजय साळुंखे उर्फ बडगुजर वय २३ रा. सुंदरगढी पुंडलीक नगर चोपडा जिल्हा जळगांव याचे कडुन चोरीस केलेल्या ५ मोटर सायकल हस्तगत केल्या आहेत.


यामा R15 कंपनीची पांढ-या लाल रंगाची मोटार साकयल क्रमांक एम एच १५ – इ जे – १९५६ , हिरो एच एफ डिलक्स कंपनीची विना नंबर प्लेट असलेली काळया रंगाची त्यावर लाल पटटे असलेली मोटर सायकल, होन्डा ड्रीम सीडी ११० कंपनीची काळया रंगाची त्यावर लाल पटटे असलेली मोटर सायकल , हिरो एच एफ डिलक्स कंपनीची काळया रंगाची ल्यावर लाल पटटे असलेली तिचा क्रं एम एच १९ – सी क्यू ०४५३ होन्डा शाईन कंपनीची ग्रे रंगाची त्यावर पांढ-या रंगाचे पटटे असलेली तिचा क्रं एम एच ४६ – एम एल ७०३५ चोरी केलेल्या मोटर सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

सदर कामी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार , अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , सहा. पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले उप विभाग चोपडा यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन त्यांचे आदेशान्वये पोहेका जितेंद्र सदाशिव सोनवणे, पोहेका सुनिल पाटील, पोहेका विलेश सोनवणे, पोना महेंद्र श्रीराम साळुंखे, पोना हेमंत मोहन कोळी, पोका प्रकाश देवसिंग मथुरे, पोका प्रमोद मांगीलाल पवार,अश्यांनी सदर चोरीच्या मोटर सायकली आरोपी पवन साळुंखे याचे कडुन हस्तगत केलेल्या आहेत व सदर मोटर सायकली चोपड़ा शहर पोलीस स्टेशनला जप्त असुन सदर गुन्हयाचा तपास चोपडा पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका जितेंद्र सदाशिव सोनवणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More