चोपड्यात दि.११ ते १५ डिसेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमाला#
नगर वाचन मंदिराचे आयोजन..

चोपड्यात दि.११ ते १५ डिसेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमाला
नगर वाचन मंदिराचे आयोजन

महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-


चोपडा – येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या वतीने दि.११ ते १५ डिसेंबर दरम्यान ५३ व्या शारदीय व्याख्यानमाले आयोजन करण्यात आले आहे.खान्देशात अत्यंत मानाची व्याख्यानमाला म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते.कोविड १९ च्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी हे आयोजन करण्यात आले आहे.


या व्याख्यानमालेचा शुभारंभ दि.११ रोजी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.शिरीष मोरे महाराज यांच्या “श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व” या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.दि.१२ रोजी लेखक व अभिनेता अशोक समेळ (मुंबई) यांचे “मी अश्वत्थामा चिरंजीव (महाभारत)” या विषयावर व्याख्यान होईल.तर दि.१३ रोजी जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांचे “आदर्श आहार विहार पध्दती” तसेच कवी अनंत खेळकर यांच्या “हास्य धबधबा” व्याख्यानांचा दुहेरी योग येणार आहे.दि.१४ रोजी दूरदर्शन निवेदिका दिपाली केळकर (मुंबई) यांचे “गप्पांच्या गावा जावे” याविषयी व्याख्यान होणार आहे.व्याख्यानमालेचा समारोप दि.१५ रोजी डॅा.अभिजित सोनवणे (पुणे) यांच्या “भिक्षेकरी ते गांवकरी..एक प्रवास” याविषयीच्या व्याख्यानाने होणार आहे.


व्याख्यानमाला दररोज गांधी चौकाच्या प्रांगणात रात्री ९ वाजता पार पडणार आहे.रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More