चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टला शासनाचा आदर्श जलसंवर्धक पुरस्कार जाहीर

चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टला शासनाचा आदर्श जलसंवर्धक पुरस्कार जाहीर

चोपडा ( प्रतिनिधी ) — येथील चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून मागील १० वर्षांपासून चोपडा शहरात जलसंधारण , नाला खोलीकरण , नाला बांध दुरुस्ती व शेत तळे निर्मोती ही कामे करण्यात आली आहेत .. या कामाची व अथक परिश्रमाची दखल घेत ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन , मीडिया एग्झिबिटर्स आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीथॉन या स्पर्धेत बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टला आदर्श जलसंवर्धक पुरस्कार २०१९ नुकतेच जाहीर करण्यात आला आहे .या पुरस्काराचे वितरण २४ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे
दि चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट द्वारा मागील १०-१२ वर्षांपासून जलसंधारणासाठी चोपडा तालुक्यातील नागलवाडी , वर्डी , मामलदे , हरेश्वर नाला चोपडा , सुंदरगढी ,रामपूर , के.जी.एन कॉलनी व आडगाव रस्ता (चोपडा शहर ) या विविध ठिकाणी पाणी आडवा – पाणी जिरवा हि मोहीम यशस्वीपणे राबवली गेली. राज्यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे “जलाशये निर्मावी , मंदिरे उभारावी , ज्ञानमंदिर उघडावी हे तो छत्रपतींचे कार्यच “.याच उक्ती प्रमाणे दि चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टचे कार्य कुशल , कार्य तत्पर , दूरदर्शी , समाजाभिमुख व्यक्तिमत्व श्री. चंद्रहासभाई गुजराथी यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने जलसंधारणाचे अभियान यशस्वी करून दाखविले. या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषिविभागाच्या वतीने ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन , मीडिया एग्झिबिटर्स आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीथॉन या स्पर्धेत बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टला आदर्श जलसंवर्धक पुरस्कार २०१९ जाहीर झाल्याचे नुकताच एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे
चोपडा तालुक्यात मागील २ वर्षां पासून कमी झालेले पर्जन्यमान , पाणी टंचाई यामुळे भूजल पातळी आपला निच्चांक गाठत होती. यासाठी “जल है तो कल है ” हि संकल्पना मना मनात रुजवण्यासाठी कार्य सुरु केले. संस्थेच्या या प्रयत्नांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसानंतर सर्व नाले , शेततळे , बंधारे यात कोट्यवधी लिटर्स जलसंचय झाला. परिणामस्वरूप प्रकल्पा अंतर्गत
पाण्याचा दुर्भिक्ष कमी होऊन संबंधित गावातील चाहुबाजूंना जलाशयात पाण्याचा साठा झाला. यामुळे गावातील कूपनलिकांमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली.


बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्ट ने केलेले असे आखीव रेखीव काम बघून परिसरातील जनता तसेच गावातील नागरिक मंत्रमुग्ध झाले. सुंदरगढी चा हा नाला गावात जलसंवर्धनासाठी आदर्श बनला. व याचे फलस्वरूप श्री. चंद्रहासभाई गुजराथी यांना गावातील विविध भागातील लोक ‘आमच्याही परिसरात अशी योजना राबवा ‘ असे आवाहन करू लागले व त्यास हवी ती मदत आम्ही करू अशी ग्वाही देऊ लागले.
हरेश्वर येथील नाला (नवर नदी पात्र , हरेश्वर मंदिराजवळ ,(चोपडा शहर) के.जी.एन कॉलनी , आडगाव रस्ता (चोपडा शहर ) आता बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टचे पाणी आडवा पाणी जिरवा ह्या उपक्रमाचे रूपांतर अभियानात झाले होते.
शेत तळे व नाला खोलीकरण या प्रकल्पांमुळे गाव पाणीदार झाले आहे. त्याचे समाधान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसून येते.
वरील सर्व कार्याचे फळ या वर्षी मिळाले. सबंध चोपडा तालुक्यात समाधानकारक झालेल्या पाऊसामुळे सर्व नाले , शेत तळे व बंधारे हे पाण्याने ९ ते १० वेळा भरून निघाले. या नाल्यांमधील पाणी दररोज जमिनीत ०.७५ मी. पाझरले असून ते प्रमाण या वर्षी सरासरीने ०.६० मी. एवढे झाले आहे. दि चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या जलसंधारणाच्या कामामध्ये भारतीय जैन संघटना सह ग्रामस्थांनी व्यापक प्रमाणात लोकसहभाग घेतला. नाला खोलीकरणाचे काम करत असताना लागणारे वाहन व इतर व्यवस्था यात ग्रामस्थांनी सक्रिय हातभार लावला. खोलीकरणात निघालेला गाळ हा शेतकरी बांधवानी आपल्या शेतात टाकला त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. या सर्व अभियानाचा एकत्रित परिणाम असा झाला कि चोपडा तालुक्याच्या चारही बाजूना कोट्यवधी लिटर्स पाण्याचा जलसंचय झाला.
अश्या पद्धतीने चोपडा पीपल्स को ऑप बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून जलाशयाचे हे पुण्यकर्म झाल्याने प्रचंड विलंबाने मिळणारे गोड पाणी हे निदान ३-४ दिवसाआड मिळेल याची खात्री या कामाद्वारे झाली आहे. “पाणी आडवा – पाणी जिरवा ” या महत्वाकांक्षी योजनेचे जनक मा. अण्णा हजारे , मा. पोपटराव पवार , मा. विनायकदादा पाटील , जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती मा. अशोकभाऊ जैन यांच्या नंतर श्री चंद्रहासभाई गुजराथी यांचे नाव घेणे वावगे ठरणार नाही.
त्यांना या कामात श्री. मोरेश्वर प्रभाकर देसाई (उपाध्यक्ष), प्रवीणभाई विठ्ठलदास गुजराथी (ट्रस्टी),आशिष अरुणलाल गुजराथी (ट्रस्टी),वसंत गोवर्धनदास गुजराथी(ट्रस्टी),प्रफुल्ल किसनदास गुजराथी (ट्रस्टी),सुनील तिलोकचंद जैन (ट्रस्टी), विकास कांतीलाल गुजराथी(ट्रस्टी), राजेश शांतीलाल सराफ (ट्रस्टी),शिरीष दगडुसा गुजराथी (ट्रस्टी),
या सर्व विश्वस्तांचे अमूल्य सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More