भाजपाचे खासदार रक्षाताई खडसे यांची चोपडा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी.

भाजपाचे खासदार रक्षा खडसे यांची नुकसानग्रस्त गावांना भेटी.
योग्य ते पंचनामे करण्याचा तहसीदारांना दिल्या सूचना.
चोपडा(प्रतिनिधी)- चोपडा तालुक्यात पारगाव, अडावद, देवगाव, धानोरा,चुंचाळे व अनेर परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून भाजपाच्या खासदार रक्षा खडसे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या शेती पिकाचे झालेले नुकसान बघण्यासाठी थेट बांधावर गेल्या.दि.८ रोजी चोपडा तालुक्यात त्यांनी अनेक बाधीत गावांना भेटी देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तहसीलदार अनिल गावीत यांना तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत लवकर कशी देता येईल यावर चर्चा करून काही महत्वाच्या सूचना देखील दिल्या.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे पुर्णतः हिरावून गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी धीर दिला. या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत भाजपाचे
पं.स. सभापती व तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, माजी जि. प.सदस्य शांताराम पाटील, तहसीलदार अनिल गावित, तालुका कृषी अधिकारी श्री.चौधरी, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे, भाजप जिल्हा चिटणीस राकेश पाटील, भरत सोनगिरे, विकी डॉक्टर आदी उपस्थित होते.












