हा मतदारांसह लोकशाहीचा अपमान आहे…जगन्नाथ टि. बाविस्कर यांची स्पष्टोक्ती,

हा मतदारांसह लोकशाहीचा अपमान आहे…जगन्नाथ टि. बाविस्कर यांची स्पष्टोक्ती,


चोपडा प्रतिनिधी _ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाचा अभ्यास करून भारताची आदर्श लोकशाही बनविली.म्हणूनच त्यांना विश्वातील महानायक व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधिले जाते.राष्ट्रीय सण ,उत्सवांप्रमाणेच गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुका मोठा गाजावाजा करून लोकशाही पद्धतीने घेतल्या जातात. जशी समुद्राला भरती ओहोटी तशी दर पाच वर्षांनी लोकशाहीला निवडणुकींचे उधाण येत असते. नुकत्याच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. निवडणुकीत उमेदवारांनी नवरदेवाची तर मतदारांनी वर्राडींची भूमिका निभविली .सत्ता स्थापनेसाठी मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत दिलेले असताना सुद्धा पंधरा दिवस झाले तरी सरकार स्थापनेचा पोरखेळ सुरूच आहे.अशातच अल्पमताचे नेते सुद्धा राज्यपालांना भेटुन सरकार स्थापनेचा दावा करतात हे लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची व मध्यावधी निवडणुका घेण्याची परिस्थिती निर्माण होत असेल तर.. हा मतदारांसह लोकशाहीचा अपमानच आहे. अशी स्पष्टोक्ती सामा. कार्यकर्ते जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केलेली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी ,कामकरी व सामान्य जनता हवालदिल झालेली आहे .तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे .सरकार स्थापन होईल व आपल्याला मदत मिळेल या आशेने शेतकरी आ वासून बघत आहे .सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय सरकारला शेतकरी जिवंत राहण्यासाठीचाच घ्यावा लागेल, अन्यथा मध्यावधी किंवा पुढील पंचवार्षिक ला परिवर्तन अटळ आहे. कारण भारतीय लोकशाहीतील मतदार हे दहा किंवा पंधरा वर्षांनी सत्ता उलथापालथ करीत असतात. सध्या तरी युतीला जास्त झाल्याचे दिसते आहे .आघाडी दबा धरून बसलेली आहे .मनसे वंचितमुळे अडचणीत आहे. अशी बिकट परिस्थिती असतांना स्पष्ट बहुमत असुनही सरकार स्थापण्यास होत असलेला विलंब हा मतदारांचा अपमानच आहे, असेही मत गोरगांवले बु।। चे माजी सरपंच जगन्नाथ टि. बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More