चोपड्यात ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ,दिंडींत उपस्थितांचा प्रचंड उत्साहअयोध्या निकालानंतर प्रविमंच्या प्रांगणावर निघाली दिंडी

चोपड्यात ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ,
दिंडींत उपस्थितांचा प्रचंड उत्साह
अयोध्या निकालानंतर प्रविमंच्या प्रांगणावर निघाली दिंडी


चोपडा – येथील नगर वाचन मंदिर (तालुका वाचनालय) व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१० ला होणाऱ्या खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या पुर्वसंध्येला ग्रंथदिंडी प्रसंगी साहित्य रसिकांत प्रचंड उत्साह यावेळी दिसून येत होता.अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातून निघणाऱ्या दिंडीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने प्रताप विद्या मंदिराच्या प्रागंणावर लांबलचक वाद्यवृंदासह दिंडी काढण्यात आली.
प्रताप विद्या मंदिराच्या प्रांगणावर माजी आमदार स्व. मगनलाल गुजराथी यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी प्रारंभी पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर सरस्वती पुजन व ग्रंथ पुजन शहरातील जेष्ठ धन्वंतरी डॅा.विकास हरताळकर,डॅा.विजय पोतदार,माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी, नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, चोपडे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी, सचिव माधुरी मयूर,मध्यप्रदेश मराठी अकादमीचे निर्देशक पौर्णीमा हुंडीवाले,महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य अशोक सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिंडीनिमित्त निघालेल्या पालखीत ज्ञानेश्वरी,भागवत,भारतीय संविधान ही ग्रंथे ठेवण्यात आली होती.
याप्रसंगी सिनेट सदस्या पुनम गुजराथी, नगर वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रा. एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॉ. परेश टील्लू, संचालक किरण गुजराथी, प्रभाकर महाजन, स्नेहल पोतदार, संजीव गुजराथी, व्ही. एस. पाटील, प्रफुल गुजराथी, श्रीकांत नेवे, अॅड. अशोक जैन, धीरेंद्र जैन, मोरेश्वर देसाई, अवधूत ढबू, सोमनाथ बडगुजर,रजनी सराफ,विद्या अग्रवाल, नगर परिषदेचे गटनेते जीवन चौधरी, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, नगरसेवक रमेश शिंदे, प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक डी. व्ही. याज्ञिक,विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे,महिला मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चौधरी,अरुण संदानशिव, विलास पाटील,प्राचार्य राजेंद्र महाजन,प्राचार्य योगिता पाटील,सुतगिरणी संचालिका रंजना नेवे,प्राचार्य ईश्वर सौंदाणकर यांच्यासह शहरातील साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्ररथांनी वेधले लक्ष
नगर वाचन मंदिर च्या जिल्हास्तरीय साहित्य साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ग्रंथदिंडीत शहरातील विविध शाळांचे आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. यात प्रताप विद्या मंदिर, माध्यमिक विद्यालय, (नागलवाडी), महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, विवेकानंद विद्यालय, चोपडे शिक्षण मंडळाचे अध्यापक विद्यालय यांचे चित्ररथ सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीतील आदिवासी नृत्य, चोपडा तालुक्यातील साहित्यिकांची ओळख, बहिणाबाई चौधरींचा जीवनप्रवास या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथ दिंडीत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आभार प्रदर्शन आशिष गुजराथी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More