वेदना देणारी गोष्ट नाकारण्याची ताकद साहित्यिकांत हवी-
अ.भा.नाट्य परिषद अध्यक्ष प्रेमानंद गज्वी

खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन उत्साहात
डॅा.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी
चोपडा- प्रादेशिक साहित्य राष्ट्रीय स्तरावर पोहचले पाहिजे. साहित्याचे रंजनात्मक, ज्ञानात्मक, प्रयोगशीलता असे तिन प्रकार असतात. दैनंदिन जीवनात होणाऱ्या वेदनेतून जाणिव निर्माण झाली पाहिजे. जाणिवेच्या वेदनेशिवाय कला निर्मिती शक्य नाहि. वेदना देणारी गोष्ट नाकारण्याची ताकद साहित्यिकात असली पाहिजे. वेदना जशी व्यक्तीची असते तशीच ती समाजाची आणि राष्ट्राची असते असा विश्वास उद्घाटक अ.भा.नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केला.
ते महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व नगर वाचन मंदिर (तालुका वाचनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलनाच्या डॅा.सुशिलाबेन शहा साहित्य नगरीत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी होते.
यावेळी प्रेमानंद गज्वी पुढे म्हणाले की, ज्ञानदर्शी व उपाय योजना सांगणारी कला असली पाहिजे.कला कुणाची बटीक नसते.बटीक असते ती कलाच नसते. साहित्यात ठोसपणे मांडला पाहिजे,म्हणून प्रयोगशिलतेकडे वळले पाहिजे. साहित्यात थकवा येऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.कौटूबिंक जिव्हाळ्यात अडकलेले साहित्य असल्याने त्याचे भाषांतर होत नाही.वेदनेतून कलेचा जन्म होतो त्यातून जाणिव झाली पाहिजे.जाणिवेच्या वेदना हटविल्या पाहिजे.जाणिव,वेदना,नकार,ही मुल्ये सांगितली पाहिजे.मराठी साहित्य भारतातील सर्व भाषांसह परकिय भाषेत गेले पाहिजे.वेदना व्यक्ती,राष्ट्र समाजाची बनते. व्यक्ती विरूद्ध समाज, समाज विरूद्ध समाज,माणसाला शरम आणणा-या गोष्टी आपण लिहल्या पाहीजेत.समाज विरूद्ध राष्ट्र असाही घटक आहे.राष्ट्र विरूद्ध राष्ट्र,शासनाच्या विरोधात साहित्यिकांनी काही लिहलं का? राज्यकर्त्यांना द्वेष पेरतात,३७०,रामजन्मभुमी, यावर बोलायचं नाही असे भावना दाबणारे वातावरण का निर्माण केले जाते?भाडवंलदार व भांडवलविरहीत साहित्यातील कंपू साहित्याचे भले करु शकत नाही असेही त्यांनी सांगितले.कलाकृती समग्रतेचे भान असणारी घडो हीच इच्छा आहे गज्वी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुरूवातीला अपर्णा भट कासार (जळगाव) यांच्या समूहाने गणेश वंदना व सरस्वती वंदना सादर केली.
यावेळी संमेलनाचे उद्घाटन उद्घाटक अ.भा.मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.तसेच मान्यवरांनी दिपप्रज्वलन करुन केले.
प्रास्ताविक करतांना नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी सांगितले की,महाराष्ट्राला विशाल मराठी साहित्य आणि साहित्यिकांची मोठी परंपरा आहे.मानवी जीवनाकडे भरण्याचे प्रभावी तत्वज्ञान बहिणाबाईंकडे होते.त्या अशिक्षीत असल्या तरी त्यांचा स्वानुभव त्यांनी आपल्या कविता मांडल्या त्यातील विचार अंत्यता मोलाचा आहे.पुन्हा जळगाव जिल्ह्यात साहित्य संमेलन व्हावे अशी आपली इच्छा अाहे.हे संमेलन करत असताना अनेकांनी आम्हास सहकार्य केले.
पाहुण्याचा परिचय कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी करुन दिला.

सत्कार समारंभात उद्घाटक प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार अशिष गुजराथी यांनी केला.तर मान्यवरांचा सत्कार उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू,संचालक मोरेश्वर देसाई,विद्या अग्रवाल,अॅड.अशोक जैन,रजनी सराफ,श्रीकांत नेवे यांनी केला.
याप्रसंगी देणगीदार माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी,माजी अध्यक्ष अरविंद गुजराथी,अॅड.व्ही.डी.जोशी,प्रदीप जैन,डॅा.विकास हरताळकर, डॅा.मधुमालती भुतडा,प्रा.डी.जे.पाटील,ब-हाणपूर येथील शब्द मैत्री मंडळ ब-हाणपूर राजीव मुजूमदार,अनुराधा मुजूमदार यांचे स्वागत करण्यात आले.
विशेष सन्मान
साहित्य क्षेत्रातिल विशेष योगदानाबद्दल कविवर्य अशोक सोनवणे,मध्यप्रदेश मराठी अकादमीच्या निदेशक पदावर नुकत्याच नियुक्त झालेल्या चोपड्याच्या सुकन्या पौर्णिमा हुंडीवाले यांचा सत्कार प्रेमानंद गज्वी,डॅा.केशव देशमुख, प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह देवून करण्यात आला.
उत्तम वाचक पुरस्कार
याप्रसंगी नगर वाचन मंदिराच्या सभासदांमधून
२०१७/१८ सालासाठी पी.एन.सोनार. तर सन २०१८/१९ डॅा.मनोहर अग्रवाल यांना माजी उपनगराध्यक्ष स्व.नानासाहेब रमेश वसंतराव देशमुख उत्तम वाचक पुरस्कार देवून नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी ,प्रा. डॅा.केशव देशमुख व मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले.
जमुनाई हस्तलिखाचे प्रकाशन
भगिनी मंडळाच्या सदस्यांनी निर्माण केलेल्या
‘जमुनाई’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी,ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन उपस्थित होते.
अध्यापक विद्यालयाची विद्यार्थीनी पल्लवी बाविस्कर हीने ग्रंथदिंडी व साहित्य संमेलन स्थळी बहिणाबाई चौधरी यांची भुमिका सादर केली म्हणून तीचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी नगर वाचन मंदिराचे माजी अध्यक्ष डॅा.किसनलाल बी.भुतडा व्यासपिठावर समेलनाचे अध्यक्ष माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी, उद्घाटक अ.भा.मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी(मुंबई) ,साहित्यिक प्रा.डॅा.केशव देशमुख(नांदेड) , महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य अशोक सोनवणे,रमेश पवार (अमळनेर),मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीच्या निदेशिका पौर्णिमा हुंडीवाले (ब-हाणपूर), साहित्यिक कुंदा प्रधान (कोल्हापूर), वि.दा.पिंगळे (पुणे),डॅा.मिलिंद बागूल (जळगाव),नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी,उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश गुजराथी आदि उपस्थित होते.
प्रा. डॅा.केशव देशमुख
प्रमुख मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जिभेवरच्या भाषेला केंद्रस्थानी ठेवून हे संमेलन होत आहे.या साहित्य संमेलनातून समाज चिंतन,भाषा चिंतन मंडले जात आहेत.वाचन संस्कृती जोपसण्यासाठी हे संमेलन आदर्श ठरणार आहे.निर्वाचन होत असताना साहित्य संमेलनाची गरज आहे.सांस्कृतिक अभिसरणासाठी अश्या संमेलनांची गरज आहे.गाडगेबाबांनी कीर्तन नावाचे माध्यम वापरून संवाद निर्माण केला.लेखककाने जनते सोबत असावे तरच त्याच्या सोबत जनता असते..त्यांनी समाजा सोबत राहिले पाहिजे.लेखकांनी लोकशाहीच्या उत्थानासाठी लेखन केले पाहिजे.साहित्यातून माणूस वजा करता येणार नाही. नखावर शाई म्हणजे लोकशाही असे फ.मु.नी सांगितले. भाषेबद्दल आपण फारसे गंभीर नाहीत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी हे संमेलन पाया ठरते आहे.नागराज मंजूळे,भाऊ कदम अश्या कलावंतांनी जिभे वरची भाषा चित्रपटात आणली.भाषेला अत्यंत संकटातून जावे लागत आहे.साहित्य संमेलन हा नुसता क्षण नाही.साहित्य संमेलनाचा ठसा महाराष्ट्रात उमटेल.मातीला व नात्यांना जपणे महत्वाचे आहे.माणूस वाडमयातून वजा करता येत नाही त्यामुळे साने गुरुजी व बहिणाबाईचे साहित्य आताचे वाटते.लेखक व त्याची जबाबदारी मी का कश्यासाठी,कुणासाठी लिहतो हे पाहिले पाहिजे.साहित्य निर्मिती रंजनाच्या हेतूने करणे चुकीचे ठरणार आहे.समाजाला जगण्याचा, काळाचा भान द्यावेच लागेल.परंपरेचा विसर न पडता लेखन निर्माण झाले पाहिजे. भाषे सोबत बहुभाषिक होणे काळाची गरज आहे.भाषेचा तौलनिक अभ्यास करणे आवश्यक आहेत.वाडमयाची दिशा बहुमुखी झाली आहे.भाषीक भाषेची क्रांती या साहित्य संमेलनात आहे असे प्रतिपादन प्रा.डॅा.केशव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करतांना केले.
अरुणभाई गुजराथी
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना अरुणभाई गुजराथी म्हणाले की,
हृदयात प्रेमाचे झाड असलेला रसिक असतो.मराठी भाषा अभिजात होतांना ती दोन हजार वर्षांची भाषा आहे.त्यात दोन लाख शब्द आहेत.अभिजात भाषा निर्माण करण्यासाठी केंद्राकडे गेले पाहिजे. साहित्याची पहिली कडी मानवता वाढविते ते साहित्य, भारतीय लोकशाही बळकठीचे काम साहित्यिकांनी केले.बहिणाबाईची साहित्यिक दृष्टी विज्ञानाशी जुडलेली आहे.रामयणात वाचन व वचन संस्कृती दिसते.रामतणातील सीता,महाभारतातील द्रौपदी यांच्यात साम्य आहे.संत साहित्याने व्यवसायातून परमार्थाची भुमिका दिली.मराठीवरील अाक्रमण थांबविले पाहिजे.भाषेच्या माध्यमातून साहित्य निर्माण करण्यासाठी वेगळे मुल्य लागतात त्यांची जोपासना झाली पाहिजे.साहित्यिकांना शब्दशक्ती कमी असली तरी राष्ट्रभक्ती असली पाहिजे.मराठीत साहित्य समृध्द आहे.कवितेला गेय नसला तरी ध्येय असले पाहिजे. देशातील आई व साहित्यिक चांगले असल्याने प्रगती निश्चित होणार आहे.न बोलता ऎकू येणारे शब्द असतात.
याप्रसंगी मध्यप्रदेश मराठी अकादमीच्या निर्देशिका पौर्णिमा हुंडीवाले यांनी मनोगत व्यक्त केले.

ध्वजरोहण
खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलनाचा नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन
या जिल्हास्तरीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिक डॅा.केशव देशमुख व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या साहित्य संमेलनास माजी आ.प्रा.दिलिपराव सोनवणे,सुतगिरणीचे चेअरमन माजी आ. कैलास पाटील, पालिकेचे गटनेते जीवन चौधरी यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय बारी,अविनाश कुलकर्णी, प्रभाकर महाजन यांनी केले.आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी यांनी केले.













