समाज जोडणारे साहित्य निर्मितीसाठी संमेलनांची नितांत गरज
समारोप सोहळ्यात समारंभाध्यक्ष अरुणभाई गुजराथींचे प्रतिपादन

स्व. डॉ. सुशीलाबेन शाह साहित्यनगरी
चोपडा – समाजात मानव निर्मितीत साहित्य व सांस्कृतिक वातावरण खूप महत्वाचे आहे. समाज जोडणारे साहित्य निर्माण करण्याासाठी ग्रामिण भागात झालेले साहित्य संंमेलन नितांत गरजेचे आहे.नगर वाचन मंदिराच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केेलेला साहित्य संमेेलनाचा
पहिलाच उपक्रम समाजापयोगी व साहित्य,संस्कृती जपणारा ठरला.उत्तोमत्तम साहित्याकृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी किमान तालुकास्तरीय साहित्य संमेलन घ्यावे अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केली.
येथे महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ आणि नगर वाचन मंदिर(तालुुका वाचनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी साहित्य संमेलन या जिल्हास्तरीय सोहळ्याची संध्याकाळ सांंस्कृतिक कार्यक्रम व कविसंमेलनाने बहारदार झाली.
@कविसंमेलन@
साहित्य संमेलनातील स्व. बाबूलाल छगनलाल गुजराथी कविसंमेलनात कवी रमेश पवार (सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन संपन्न झाले. या कविसंमेलनात डॉ संजीवकुमार सोनवणे, बाळकृष्ण सोनवणे, प्रा. एस. टी. कुलकर्णी, रमेश धनगर, योगिता पाटील, विलास पाटील खेडीभोकरीकर, कृपेश महाजन, दिनेश चव्हाण, राजेंद्र पारे, अरुण जोशी, ललिता पाटील, तुषार लोहार, किशोर नेवे, जया नेरे यांनी आपल्या रचना सादर केल्या. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी, समीक्षक प्रा. डॉ. रमेश माने (अमळनेर) यांनी केले.
साहित्य संमेलनाच्या पुढील सत्रात
मराठी साहित्य अकादमी, भोपाल (म.प्र.) च्या निदेशिका पोर्णिमा हुंडीवाले यांनी हिंदू मुस्लीम ऐक्याची भावना रुजणारी एक भावस्पर्शी कथा आपल्या कथाकथनात प्रभावीरीत्या सादर केली.
@गांधी नाकारायचा आहे – नाट्य अभिवाचन@
परिवर्तन संस्था, जळगाव निर्मित ‘गांधी नाकारायचा आहे’ या शंभू पाटील लिखित दिग्दर्शित नाट्यसंस्थेचे अभिवाचन करण्यात आले. गांधीजी स्त्रियांबद्दल अनुदार होते, फाळणीला गांधीजींना जबाबदार होते, अहिंसेने स्वातंत्र्य कसे मिळू शकते, गांधीजींनी भगतसिंगांची फाशी रद्द केली नाही यासारख्या समाजात असलेल्या चुकीच्या धारणांवर अतिशय प्रभावी पद्धतीने भाष्य या अभिवाचनातून करण्यात आले. अभिवाचनात नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, होरलसिंग राजपूत, हर्षल पाटील, मंगेश कुलकर्णी, प्रा. मनोज पाटील यांनी सहभाग घेतला तसेच संगीत संयोजनाची जबाबदारी राहूल निंबाळकर यांनी पार पाडली.
नृत्याविष्काराने भरला रंग

जळगाव येथील प्रभाकर कला संगीत अकादमीच्या डॉ. अपर्णा भट – कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या अकादमीतील विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या ‘माझी माय सरसोती’ या गीतासह , शिववंदना, शंकर – कृष्ण – विष्णू या पौराणिक पात्रांना साकार करणारा नृत्याविष्कार सादर केला. या नृत्याविष्काराने साहित्य संमेलनात रंग भरला. सुंदर पदन्यास, भावपूर्ण अदाकारी यामुळे उपस्थितांना हा नृत्याविष्कार विशेष भावला. यात कोमल चव्हाण, राधिका सरोदे, मृणाल सोनवणे, शिवानी जोशी, ऋतुजा महाजन, हिमानी पिले, मृणाल कुलकर्णी, मधुरा इंगळे, भार्गवी खैरनार, दिशा ढगे या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
बहिणाबाईंच्या काव्यात्मक जीवनाचा भावस्पर्शी प्रवास

साहित्य संमेलनाच्या सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील ७२ वर्षीय नाट्यकलावंत सौ. कुंदा प्रधान यांच्या बहिणाबाईंच्या काव्यात्मक जीवनाचा भावस्पर्शी प्रवास या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते सौ कुंदा प्रधान यांनी लेवा बोलीतून बहिणाबाईंच्या बालपणापासूनच तर शेवटच्या श्वासापर्यंतचा प्रवास माध्यमातून अतिशय प्रभावीपणे साकारला. तत्कालीन संदर्भ आणि परिस्थितीचे तसेच बहिणाबाईंच्या जीवनातील घटनांचे चढ-उतारांचे केलेले अतिशय प्रभावी सादरीकरण उपस्थितांना भावले.
कार्यक्रमाचे अखेरीस आभार प्रदर्शन अवधूत ढबू यांनी करुन वंदे मातरमने संमेलनाची सांगता झाली.यावेळी नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू,संचालक मोरेश्वर देसाई, सोमनाथ बडगुजर, प्रफुल्ल गुजराथी, श्रीकांत नेवे,प्रभाकर महाजन,संजय गुजराथी, स्नेहल पोतदार,विद्या अग्रवाल,रजनी सराफ,धिरेंद्र जैन,व्ही.एस.पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल गोपाळ दांडेकर,रमेश सोनार,अजय जोशी,मयूर लाड यांनी परिश्रम घेतले.तसेच महिला मंडळ शैक्षणिक संकुलातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन












