चोपडा:हॉटेल इंडिया जवळ ट्राला-मोटारसायकल अपघात एक गंभीर जखमी;पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलविले.

चोपडा(प्रतिनिधी)-शहरातील महात्मा गांधी उद्यानापासून हाकेच्या अंतरावर हॉटेल इंडिया जवळ ट्राला व मोटारसायकल यांच्यात धडक होऊन यात मोटारसायकल चालक सुरेश मगन पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे की,तालुक्यातील सनपुले येथील रहिवाशी हे आपल्या मोटार सायकल क्र. एम एच १९ ए एच ४७८९ वरून चोपडाकडुन वेलेेकडे सकाळी ९.३० च्या सुमारास जात असतांना समोरून येणारा ट्राला क्र. एच आर ३८ टी ३७७१ या वाहनात जोरदार धडक झाल्याने मोटारसायकल चालक सुरेश पाटील(३६) रा.सनपुले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना व डाव्या हाताला फ्रॅक्चर होऊन जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात डॉ सुरेश पाटील व पवन पाटील यांनी प्राथमिक उपचार केले.प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ त्यांना जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.सदर घटनेत ट्राला चालकाने पळ काढला असून पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.यावेळी ऍड शिवराज पाटील,सनपुले आश्रम शाळेचे अध्यक्ष पी जे पाटील यांनी मदतकार्य केले.












