चोपड्याचा सूतगिरणीत काशी विश्वनाथ महादेव जी प्राणप्रतिष्ठापना व महाप्रसाद

चोपड्याच्या सूतगिरणीत काशी विश्वनाथ महादेवाची प्राणप्रतिष्ठापना व महाप्रसाद


चोपडा – येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या काशी विश्वनाथ महादेव मंदिरात “श्रीं” च्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना तीन दिवस विधीवत पूजा अर्चा करुन करण्यात आली.
दि.१० ते १२ डिसेंबर दरम्यान काशी विश्वनाथ महादेव मंदिराच्या विशाल प्रांगणात प्राण प्रतिष्ठापना निमित्त विविध स्वरूपाच्या पूजा पार पडण्यात आल्या.त्यासाठी पौरोहित्य महेश जोशी व रघुनाथ जोशी तसेच सहकारी पुरोहितांनी केले.तर या महापुजेला संचालिका जागृती बोरसे व संजय बोरसे,संचालिका रंजना नेवे व श्रीकांत नेवे, तसेच संचालक डिंगबर पाटील, रामदास चौधरी,सूतगिरणीतील अधिकारी महेश उपाध्याय,दिपक चव्हाण यांनी सपत्नीक सहभाग घेतला होता.
दि.१२ रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास श्री नवचंडी होमाची पुर्णाहुती प.पु.मधुगिरी महाराज (कोपरगाव),प.पु.जनार्दन महाराज, सुतगिरणीचे चेअरमन माजी आ.कैलास पाटील यांचे सोबत पूजेत सहभागी संचालकांनी केली.त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.यानिमित्ताने सुतगिरणीचे पहिले प्रवर्तक माजी आ.डॅा.सुरेश पाटील, पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील, माजी चोसाका चेअरमन अॅड.घनःश्याम पाटील, माजी उपनगराध्यक्ष व उद्योजक घनःश्याम अग्रवाल,माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, इंदिराताई पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, उद्योजक आशिष गुजराथी, सुनिल अग्रवाल,चोसाका व्हा.चेअरमन शशिकांत देवरे,नगरसेवक डॅा.रवींद्र पाटील, जीवन चौधरी,अश्विनी गुजराथी, सूतगिरणीचे जनरल मॅनेजर विजय पाटील, अकौटंट सुकुमार काले,कृउबाचे माजी सभापती गिरिष पाटील, विठ्ठल पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, नवल पाटील, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,प्रा.निलम पाटील,गोपाळराव सोनवणे,एल.एन.पाटील,भरत पाटील, कांतीलाल पाटील,प्रदीप पाटील,राजेंद्र सोनवणे,डिंगबर पाटील,सूतगिरणीचे संचालक प्रकाश रजाळे,तुकाराम पाटील, शशिकांत पाटील, राहुल बाविस्कर, राजेंद्र पाटील, के.डी.चौधरी,भागवत पाटील,सुनिल जैन, माधवराव पाटील,माजी नगराध्यक्षा डॅा.जया पाटील,कल्पना जगताप,पं.स.सूर्यकांत खैरनार यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या कार्यक्रमाला हजेरी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More