चोपडा येथे 23 रोजी भारतीय जैन संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड यांचा दौरा

चोपडा येथे 23 रोजी भारतीय जैन संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड यांचा दौरा


राज्यध्यक्षासह अनेक मान्यवर उपस्थिती देणार
चोपडा ( प्रतिनिधी ) — चोपडा येथे दिनांक 23 रोजी भारतीय जैन संघटना चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड तामिळनाडू यांच्या महाराष्ट्र राज्य दौरा करताना चोपडा येथे येणार असून यांच्यासोबत राज्याध्यक्ष हस्तीमलजी बंम, राज्य प्रभारी नंदूभाऊ साखला ,राज्य उपाध्यक्ष हरकचंदजी बोरा राज्य सचिव रत्नाकरजी महाजन राज्य कार्यकारणी सदस्य विनयची पारख विभागीय अध्यक्ष तुषार बाफना जिल्हा अध्यक्ष विनोद जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे


दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बोथरा मंगल कार्यालयात कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावर राजेंद्रजी लुंकड तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह अनेक मान्यवर राहणार आहेत
कार्यक्रमात भारतीय जैन संघटनेचे कार्य विशद विशाल करणार असून भारतीय जैन संघटना जैन समाजासाठी व इतरत्र समाजासाठी काय काम करते व्यापाऱ्यांसाठी अल्पसंख्यांकांच्या काय योजना आहेत ? शिष्यवृत्तीसाठी जैन समाजासाठी काय काय योजना आहेत? स्मार्ट गर्ल मूल्यवर्धन शिक्षण पद्धत सुजलाम सुफलाम कार्यक्रमांतर्गत ठिकाणी पाण्याचे नियोजन करणे अशा विविध कार्य भारतीय जैन संघटनेचे असून त्या कार्याची इत्यंभूत माहिती राजेंद्रजी लुंकड हे देणार आहेत यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सकल जैन समाजातील तपस्वीचा सत्कार करणार असं करणार आहेत त्याच त्याचप्रमाणे आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना शालेय साहित्य वहया वाटप करणार आहेत सुजलाम सुफलामच्या अंतर्गत भारतीय जैन संघटना व पिपल बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत केलेल्या पाच गावांतील नागरिक देखील उपस्थित राहणार आहेत वरील सर्व कार्यक्रमात सकल जैन समाजातील महिला व पुरुष सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडिया , तालुका सचिव दिनेश लोडाया तसेच महिला अध्यक्षा सौ सपना टाटीया सचिव सौ मानसी राखेचा यांनी केले आहे
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड चोपडा येथे पहिल्यांदाच येत आहेत चोपडा वाशी यांसाठी ही अभिनंदनाची बाब आहे यासाठी जिल्हाभरातून जैन समाजातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आव्हान विभागीय जनसंपर्क प्रमुख लतिष जैन यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More