राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज चोपडा तालुका ग्राहक ग्रामपंचायतीचे सदस्यांची बैठक संपन्न

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज चोपडा तालुका ग्राहक ग्रामपंचायतीचे सदस्यांची बैठक संपन्न


प्रतिनिधी | चोपडा–
दिनांक 24 डिसेंबर रोजी चोपडयात होणाऱ्या जळगाव जिल्हा जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक चोपडयाचे आमदार लता सोनवणे या उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, चोपडा लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा चौधरी, पंचायत समिती सभापती आत्मराम म्हाळके,बाजार समितीचे सभापती जगन्नाथ पाटील, अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद विजय मोहरीर, अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद तथा जळगाव जिल्हा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विकास महाजन, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष केदारनाथ पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य रुपेश माळी, तालुका संघटक प्रवीण पाटील,सह संघटक निलेश पालीवाल, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या महिला तालुका संघटक डॉ वैशाली पाटील, उपाध्यक्ष नितीन निकम, पंकज पाटील, मनोहर पाटील, राधेशाम पाटील,सागर बडगुजर, दिपक पाटील,आदी उपस्थित होते.
दिनांक २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिवस कसा साजरा करावा या संदर्भात जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांनी चोपडा कॉलेज रोडवरील नेटवर्क कम्प्युटर या ठिकाणी बैठक घेऊन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीत ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन लवकर करणे, ग्राहकांच्या सेवा केंद्रातून त्याच्या समस्या सोडवण्यात याव्यात,असेही विकास महाजन यांनी सूचना केल्या. २४ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या नियोजन बाबत तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी विशेष उपस्थिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
**या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी विकास महाजन याना सागितले की तालुक्यातील सर्व विभागातील समस्या त्या ठिकाणी मांडू व त्या सोडवण्यासाठी संबधित अधिकाऱयांना आम्ही भाग पाडू असेही यावेळी सांगितले.बैठकीत सूत्रसंचालन राधेश्याम पाटील तर आभार प्रवीण पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More