डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्यात महारक्तदान शिबीर २०७ बाटल्या रक्तसंचय, चाळीस पेक्षा अधिक डॉक्टर्स बंधूनी केले रक्तदान : अकरा जणांनी केला देहदानाचा संकल्प.

डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चोपड्यात महारक्तदान शिबीर : २०७ बाटल्या रक्तसंचय : चाळीस पेक्षा अधिक डॉक्टर्स बंधूनी केले रक्तदान : अकरा जणांनी केला देहदानाचा संकल्प.

चोपडा ( प्रतिनिधी )—–
शहरातील नामांकीत धन्वंतरी डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देहदान, अवयवदान व महारक्तदान शिबीराचा कार्यक्रम नववर्षदिनी उत्साहात पार पडला.शिबिरात २०७ बाटल्या रक्तसंचय करण्यात आला तर यावेळी अकरा जणांनी देहदानाचा संकल्प केला.विशेष म्हणजे शिबिरात चाळीस पेक्षा अधिक धन्वंतरींनी शिबिरात रक्तदान करून रक्तदानाचा मौलिक संदेश दिला.शहरातील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट,वंदे मातरम गृप,हेल्थ इज वेल्थ व विविध संघटनांनी शिबिराचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

देहदान,अवयवदान व महारक्तदान शिबिरात नायब तहसीलदार महेंद्र साळूखे, आय.डी.बी. आय.बँकचे शाखाधिकारी प्रेमसिंग सोलंकी,
डॉ.दीपक चौधरी,डॉ.नरेंद्र शिरसाठ,नंदकिशोर सांगोरे,नगरसेविका अश्विनी गुजराथी,डॉ. कांचन टिल्लू,डॉ.नरेंद्र पाटील,डॉ.वैशाली पाटील,डॉ.निशात सैय्यद,डॉ.एम.जी.पटेल,
डॉ.एल.टी.पाटील,डॉ.जे.डी.चव्हाण,डॉ.हेमंत पाटील, डॉ.रविंद्र पाटील,डॉ.अनवर शेख,डॉ. वाल्मिक पाटील,डॉ.निलेश महाजन,डॉ.केदार पाटील यांच्यासह चाळीस पेक्षा अधिक धन्वंतरींनी रक्तदान केले.यावेळी कांतीलाल पाटील,जुगलकिशोर पाटील,निवृत्ती पाटील, विजय पाटील ,सुनील पाटील,जितेंद्र पाटील, भगवान पाटील,भरत पाटील यांचेसह २०७ जणांनी महाशिबिरात रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.तर संजय सुर्यवंशी, सुरेखा सूर्यवंशी,रणजितसिंग राजपूत, मनिषा पाटील,गुलाबराव देशमुख,सुनिल पाटील, आनंदराव बाविस्कर,त्र्यंबक बारी,परमेश्वरी राजकुमार,हिलाल कुमावत,लक्ष्मण पाटील
या अकरा जणांनी देहदानाचा संकल्प केला.
यावेळी यशोधन ट्रस्टच्या संचालिका डॉ.तृप्ती पाटील यांनी महाविद्यालयीन तरूणींच्या रक्तदानासाठी मार्गदर्शन केले.यात हर्षाली पाटील,रिया कलानी,माधुरी भदाणे,निवेदिता व श्रद्धा देशमुख सह आदी तरुणींनी देखील रक्तदान केले.यावेळी वाढदिवानिमित्त यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राहुल पाटील यांचे अनेकांनी शिबिरात येऊन अभिष्टचिंतन केले.

रक्तसंचय करणे कामी आसकरण ताराचंद जैन रक्तपेढी, गोडवलकर गुरुजी रक्तपेढी जळगाव,रेडप्लस रक्तपेढी जळगाव व निर्णय जनसेवा रक्तपेढी धुळे यांनी सहकार्य केले
शिबिर यशस्वीतेसाठी नरेन्द्र पवार,दिनेश नाथबुवा,महेंद्र पाटील,बळीराम पावरा,संदीप पाटील,दीपक पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More