पदांपेक्षा पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे
- खासदार रक्षाताई खडसे

चोपडा -चोपडा विधानसभेला तीन जि.प.सभापती पद मिळालीत.निवडणुकीत महत्वाचे योगदान असल्याने पक्षाने न्याय दिला आहे.पक्षा संदर्भात चोपडा तालुका पुढे असतो.भाजपच्या संघटनेसाठी सक्षम लोकांची पक्षाला गरज आहे.गावागावा पर्यंत पक्षाचे काम पोहचले पाहिजे.तसेचवशहरात काम वाढले पाहिजे.तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडणूक एकमताने व बिनविरोध व्हावी ही अपेक्षा असते पण कार्यक्षम नावे चर्चेत आली त्यामुळे अपेक्षित निर्णय होवू शकले नाहीत,निवडणूक रिंगणातील नावे जिल्ह्याच्या कोअर कमेटीपुढे चर्चेला ठेवले जातील योग्य निर्णय येतील तथापी माघारी घेणाऱ्यांचे आभार व्यक्त करते.पक्षहित व लोकहिताचा विचार करुन नावे ठरवविल्या जातील.भविष्यातील निवडणुकात आपल्याला पुढे काम करायचे आहे.अध्यक्ष कोणीही होवो सर्व एकसंघ होवून पक्ष वाढीसाठी झटु,पदांपेक्षा पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी येथे केले.
खासदार खडसे भाजपच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडणूक मेळाव्यात बोलत होत्या.प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनिल नेवे यांनी केले.
मंचावर खासदार रक्षाताई खडसे,निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत बाविस्कर, नवलसिंग राजपुत,जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनिल नेवे, माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, पक्षाचे जेष्ठ नेते शांताराम पाटील, चंद्रशेखर पाटील, विस्तारक प्रदीप पाटील,दुध संघाचे संचालक ए.डी.चौधरी,कृउबा संचालक धनंजय पाटील,रवींद्र पाटील, भरत पाटील,जगन्नाथ बाविस्कर, हिंमतसिंग पाटील,जि.प.सभापती ज्योती पाटील,राज्य परिषद सदस्य मगन बाविस्कर,प्र.शहराध्यक्ष रवींंद्र मराठे,जी.टी.पाटील आदि उपस्थित होते.
चोपडा ग्रामीण मंडळासाठी तीघांची नावे जिल्ह्याकडे
ग्रामीण मंडळासाठी या इच्छूकांनी अध्यक्ष पदासाठी बारा जणांनी दावा दाखल केला.त्यात पंकज सुभाष पाटील (घोडगाव), धनंजय प्रभाकर पाटील(घुमावल), मनोज अशोक सनेर(हातेड) या तिघा जणांची नावे कोअर कमेटीकडे जाणार असून त्यातून तालुकाध्यक्षाची घोषणा केली जाईल. बारा जणांची नावे दाखल करण्यात आली होती त्यापैकी भाईदास कोळी,गोविंद सैंदाणे,विनायक पाटील, अनिल पाटील, विजय बाविस्कर,लक्ष्मण पाटील,दिलीप अडावदकर,हनुमंत महाजन,राकेश पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
नवनिर्वाचित जि.प.सभापती ज्योती राकेश पाटील यांचा सत्कार खासदार रक्षाताई खडसे यांनी तर पं.स.उपसभापती भुषण भील यांचा सत्कार प्रा.सुनिल नेवे यांच्या हस्ते करण्यात आला.

चोपडा शहर मंडळासाठी नऊ नावे कमेटीकडे
चोपडा शहररासाठी नरेंद्र पाटील,रवींद्र मराठे, दिपक बाविस्कर, डॅा.मनोहर बडगुजर, गजेंद्र जायसवाल, डॅा.राहुल पाटील,अजय राजपुत,डॅा.नरेंद्र अग्रवाल,निलेश पाटील यांची नावे जिल्हा कोअर कमेटीकडे रवाना करण्यात आली आहेत.दरम्यान शहराध्यक्ष निवड प्रक्रियेतून सुनिल सोनगिरे,तुषार पाठक,हेमंतसिंग जोहरी,मनिष पारिख,विशाल भावसार,रवींद्र बडगुजर या इच्छूकांनी माघार घेतली.आभार तुषार पाठक यांनी व्यक्त केले.












