१९ जानेवारीला दिशा मॅरेथॉन स्पर्धा २०२० चे आयोजन

१९ जानेवारीला दिशा मॅरेथॉन स्पर्धा २०२० चे आयोजन


चोपडा –
येथील दिशा फौंडेशन व पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दिशा मॅरेथॉन २०२० चे आयोजन दि १९ जानेवारी, रविवार रोजी सकाळी ६ वाजेला चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथून करण्यात आले आहे.
मागील वर्षी आयोजित दिशा मरेथॉनला मिळालेल्या उत्फुर्त प्रतिसादानंतर या वर्षी पुन्हा नव्या जोमाने ‘ एक दौड मानवता के लिए’या थीमने दिशा मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनसाठी तीन गट करण्यात आले आहेत.त्यात ५ कि मी महिला व पुरुष यासाठी वेगवेगळे तीन हजार,दोन हजार,एक हजार रु बक्षीस ठेवण्यात आले आहे तसेच तीन कि मी गटासाठी महिला व पुरुष यासाठी वेगवेगळे तीन बक्षीस ठेवण्यात आले आहे. शून्य ते बारा वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक कि मी अंतर ठेवण्यात आले असून तीन स्वतंत्र बक्षिसे आहेत.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन दिशा फौंडेशन व पाटील हॉस्पिटल यांनी केले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9765608225,917020932731 या नंबरवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More