दारूबंदीसाठी विटनेर येथील महिला एकवटल्या;संतप्त रणरागिणींनी दारूविक्रेत्यांवर राग व्यक्त करत दिले निवेदन

दारूबंदीसाठी विटनेर येथील महिला एकवटल्या;संतप्त रणरागिणींनी दारूविक्रेत्यांवर राग व्यक्त करत दिले निवेदन

चोपडा:-(प्रतिनिधी)————
दारूमुळे संसाराची राखरांगोळी झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी संघर्षाची मशाल पेटविली एकदुसऱ्याला साथ देत गावातून दारू हद्दपार करण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले.
दारू बंदीसाठी विटनेर ता. चोपडा येथील महिला एकवटल्या असून गुरूवार रोजी संध्याकाळी ५:३०वाजता ग्रामीण पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस निरीक्षक संदीप आराक यांना निवेदन दिले.महिलांनी दारुबंदीचा विषय त्यांच्यासमोर मांडला. गावात दारू पिणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कुटुंबांमध्ये दररोज भांडण-तंटे होतात. अनेक मद्यपी पुरुष कुटुंबातील महिलांना मारहाण करतात. यातूनच गावात असंतोष पसरत चालला आहे. अशा परिस्थितीत गावातील अवैध मद्य विक्री थांबली पाहिजे. दारू विक्री करणारे सर्व अड्डे बंद झाले पाहिजेत.. यावेळी महिलांनी आपले गाऱ्हाणे संदीप आराक यांच्याकडे मांडतांना सांगितले की गावातील युवक व्यसनाधीनतेकडे वळले होते. याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत.गावात अवैध रित्या विकल्या जाणाऱ्या दारूला पोलिसांचे अभय असल्याचे आरोप ही या महिलांनी केला. मात्र, सध्याचे पोलिस निरीक्षक संदीप आराक यांच्या ही बाब निदर्शनास आली तर ते ताबडतोब पावले उचलतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवेदनावर निर्मलाबाई गुलाब कोळी, प्रियंका आनंद खैरनार,ज्योतिबाई अंबादास कोळी,योगिता सुरेश कोळी,सुनंदा युवराज कोळी,मंगलाबाई हिम्मत रायसिंग, अरुणा कोळी,हिरुबाई कैलास कोळी,ज्योती प्रवीण रायसिंग, अनिता समाधान कोळी,सुनंदा पुनमचंद रायसिंग, ज्योती हिरालाल कोळी,खटूबाई लिलाचंद कोळी,शीतल ज्ञानेश्वर कोळी,संगीता संभाजी कोळी,रेखाबाई प्रल्हाद रायसिंग,तुळसा बाई कोळी या महिलांच्या सह्या आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More